LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🚩🚩 *खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते विविध गणेश मंडळांच्या गणरायाची विधीवत पूजा*



गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा, विश्वास आणि माणसांना प्रेमाने जोडणारा उत्सव, गणेशोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त बाप्पाच्या दर्शनाच्या ओढीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध गणेश मंडळांना भेट देत विघ्नहर्त्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते गणरायाची विधीवत पूजा व आरती करण्यात आली.

यावेळी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू-भगिनींना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सोलापूर शहर व जिल्ह्यातील जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान आणि भरभराट नांदो तसेच सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळो, यासाठी श्री गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.

याप्रसंगी विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments