LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*द.ह.कवठेकर प्रशालेत उत्साहाने हिंदी दिन संपन्न*

कार्यक्रमाची सुरुवात हिंदी ग्रंथ पूजनाने झाली.सुंदर गीताने अभ्यागतांचे स्वागत कु.श्रुतिका कचकल कु.शरयू कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रमुख अभ्यागत सौ.चिंचोळकर मॅडम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.व्ही.एम.कुलकर्णी सर उपमुख्याध्यापिका सौ.विश्वासे मॅडम पर्यवेक्षक श्री.शेलार सर होते.प्रस्ताविक प्रशालेचे हिंदी शिक्षक श्री.संतोष पाटोळे सर यांनी केले.हिंदी दिनाचे महत्त्व सांगताना सर्व भाषा अवगत करण्याचे आवाहन केले.कु.प्रणाली नकाते हिने अभ्यागत परिचय करून दिला.प्रशालेचे अनेक विद्यार्थी यांनी हिंदीतून आपले मनोगत व कविता,गीते सादर केली.कु.मानसी कदम व जान्हवी कदम 8क , कु.विहा गवळी व लोखंडे10 ब, कु.ईश्वरी मगर, वैष्णवी पवार, कल्याणी रोंगे, अस्मिता लोखंडे 9क, कु.वैष्णवी वाघमारे,कु.प्रज्ञा पवार 8 ब,कु.हर्षाली खवळे 10क,
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व कार्यक्रम  विद्यार्थ्यांनी सादर केला.हिंदी विषय प्रमुख श्री.माळी सर यांनी हिंदी अध्ययन कसे करावे याचे मार्गदर्शन केले.
प्रमुख अभ्यागता सौ.चिंचोळकर मॅडम यांनी हिंदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे सांगितले.अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक श्री.व्ही.एम.कुलकर्णी सर यांनी हिंदीतून आपले विचार व्यक्त केले व हिंदी विषयाचे महत्त्व विशद करत सर्व हिंदी विद्यार्थी व शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ हिंदी शिक्षक श्री.दिवाण सर श्री.मोरे सर श्री.गावडे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सूत्र संचालन कु.कार्तिकी बोडके कु.खरे यांनी केले.उपस्थित सर्व अभ्यागत व शिक्षक विद्यार्थी यांचे आभार कु.रूनजून शिकरवार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments