LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चैनस्नॅचिंग व जनावर चोरी मधील पाहिने सराईत गुन्हेगार अटक, ०२ नविन गुन्हे उघड, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त,



दिनांक दि.०७/०९/२०२६ रोजी दोन वाजताचे सुमारास लवंग ता. माळशिरस जि. सोलापूर येथे पडवीमध्ये फिर्यादीची आई व आज्जी झोपलेली असताना अज्ञात चोरटयांनी त्यांचे गळयातील सोन्याचे मण्या व सोन्याचे कर्ण फुले चोरून नेले म्हणुन अकलुज पोलीस ठाणे गुरनं ५९७/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०४ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर चोरीमुळे गावात नागरीकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते.

तसेच दि. ३०/०५/२०२६ रोजी २३/३० वा ते दि. ३१/०५/२०२६ राजी पहाटे ०५/०० वा चे दरम्याने फिर्यादी यांचे गणेशवगाव ता. माळशिरस येथील राहते घराचे समोरून ०४ शेळया व ०५ बोकडे चोरून घेवुन गेले म्हणुन अकलुज पोलीस ठाणे गुरनं ३९५/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर चोरीमुळे शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते.

वरीलप्रमाणे घडलेल्या गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेता, मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयामध्ये चैनस्नॅचिंग व जनावर चोरी करणारे आरोपीचे शोध घेवुन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक, संजय जगताप व त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यावरून संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघड करणेबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे शोध घेणेकामी आदेशीत केले होते.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि विशाल मुळे व त्यांचे पथक हे चैनस्नॅचिंग व जनावर चोरी झालेले लवंग व गणेशगव ता. माळशिरस जि. सोलापूर येथील घटनास्थळी भेट दिली. पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी आजबाजुचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली. तदनंतर गोपनिय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा टिल्ल्या उर्फ तेजस सोमनाथ जाधव, अर्जुन विजय चव्हाण दोघे रा. सवतगव्हाण अकलुज ता. माळशिरस, करण महादेव चव्हाण रा. संग्रामनगर अकलुज ता. माळशिरस यांनी मिळुन केल्याची माहिती मिळाली. तसेच त्यापैकी तेजस सोमनाथ जाधव हा त्यातील सोने विकण्यासाठी अकलुज येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे सपोनि विशाल मुळे हे त्यांचे पोलीस पथकासह कर्मविर चौक अकलुज येथे सापळा लावुन थांबले असता त्यांना तेजस सोमनाथ जाधव हा पायी चालत येत असल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात

घेवुन त्याचेकडे गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आहे. नमुद आरोपी यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करता त्यांनी त्याचे साथीदारासह खालील गुन्हे केल्याची कबुली दिली

अ.क्रं पोलीस ठाणे
गुरनं / बीएनएस कलम
१ अकलुज | ५९७/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०४ (२),३(५)
आरोपी नामे १) टिल्ल्या उर्फ तेजस सोमनाथ जाधव याचेकडुन वरील पोलीस ठाणेच्या गुन्हयातील चोरीस गेल्या मुद्देमाल पैकी ०१ ग्रॅम ८८० मिली सोन्याचे दागिने रक्कम २१,०००/- रू. (बाजार भाव) मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.

तसेच अकलुज पोलीस स्टेशन गु.र.नं. ३९५/२०२६ बी.एन.एस. क. ३०३ (२) प्रमाणे गणेश नगर अकलुज ता. माळशिरस येथील जनावर चोरीच्या गुन्हयाचा तपास करीत असताना गोपनिय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, सदरचा १) दिपक रामा काळे, रा. बिजवडी ता. माळशिरस, २) प्रल्हाद बाबु काळे, ३) नितीन सरदार चव्हाण दोघे रा. बाबरी पुल, अकलुज ता. माळशिरस यांनी मिळून केल्याची माहिती मिळाली. तसेच त्यापैकी दिपक रामा काळे हा विजय चौक अकलुज येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे सपोनि / विशाल मुळे हे त्यांचे पोलीस पथकासह विजय चौक अकलुज येथे सापळा लावुन थांबले असता त्यांना दिपक रामा काळे हा पायी चालत येत असल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली
आहे. नमुद आरोपी यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करता त्यांनी त्याचे साथीदारासह खालील गुन्हे केल्याची कबुली दिली

अ.कं पोलीस ठाणे
गुरनं / बीएनएस कलम
१ अकलुज ३९५/२०२६ भा. न्या. सं. कलम ३०३(२)आरोपी नामे १) दिपक रामा काळे याचेकडुन वरील पोलीस ठाणेच्या गुन्हयातील चोरीस गेल्या मुद्देमाल पैकी १७,५००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. सदर आरोपीत याचे गुन्हे अभिलेख अ.कं आरोपी चे नाव व स्थितीत 
दिपक रामा काळे (पाहिजे)
२ दिपक रामा काळे (पाहिजे)
मोहोळ
दिपक रामा काळे (पाहिजे)
दिपक रामा काळे
(पाहिजे)
दिपक रामा काळे (पाहिजे)
दिपक रामा काळे
(पाहिजे) दिपक रामा काळे
(पाहिजे)
पाहता खालील गुन्हयात पाहिने आरोपी आहे.
मोहोळ
पोलीस ठाणे
गुरनं
७५४/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२)
१२७५/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२)३ मोहोळ
१२८६/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२)४
पंढरपूर तालुका
२७९/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२)५
पंढरपूर तालुका
५४५/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२)६
पंढरपूर ग्रामीण
१५७/२०२५ बीएनएस क. ३०३ (२)७
पंढरपूर ग्रामीण
२०७/२०२५ बीएनएस क. ३०३ (२)
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, विशाल मुळे व पथकातील, पोलीस हवालदार मनोज भंडारी, पंकज महिंद्रकर, सिध्दराम कंटोळी, व्यंकटेशर मोरे, पोकों राहुल दोरकर, हरिश थोरात व बाळराजे घाडगे यांनी बजावली.

Post a Comment

0 Comments