ग्रीन सिटी इंग्लिश मीडियम स्कूल वेळापूर विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक यश...!!! सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून शालेय तायकांडो स्पर्धेचे पिलेव येथे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये संत सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्रीन सिटी इंग्लिश मीडियम स्कूल वेळापूरचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र गिरमे उर्फ रंजन भाऊ, सचिव, व सर्व संचालक मंडळ,मुख्याध्यापिका प्रतीक्षा भडके मॅडम व मुख्य क्रीडा प्रशिक्षक उद्धव जाधव सर यांनी यश संपादन केलेल्या मुलांचे स्वागत करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशश्री भगत. 22 ते24 किलो वजन गटात तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक गोल्ड मेडल.वैष्णवी भगत 26 ते 29किलो वजन गट प्रथम क्रमांक गोल्ड मेडल.आदित्य कदम 32 ते 35किलो वजन गट सिल्वर मेडल. तसेच मेघराज माने देशमुख सिल्वर मेडल यांनी द्वितीय क्रमांक यश संपादित केले. तालुका क्रीडा अधिकारी रणजीत लोहार हे उपस्थित होते.
0 Comments