LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; मोहोळ तालुक्यातील डिकसळ–नरखेड बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात*


मोहोळ : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मौजे डिकसळ येथील भीमा नदीवरील डिकसळ–नरखेडला जोडणाऱ्या बंधाऱ्यांच्या दुरुस्ती व संरक्षणाच्या कामास सुरुवात झाली आहे. खासदार प्रणितीताई शिंदे यांनी या बंधाऱ्यांची दुरवस्था लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर ही कार्यवाही सुरू झाली आहे.

डिकसळ–नरखेडला जोडणाऱ्या बंधाऱ्यांची स्थिती गेल्या काही काळापासून खराब झाली होती. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचे बेरिगेट्स/सुरक्षा गार्ड खराब झाले होते, तर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने नागरिकांच्या वाहतुकीस तसेच ये-जा करण्यास धोका निर्माण झाला होता. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यास बंधाऱ्याच्या संरचनेला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच काही भागातील संरक्षण भिंत जीर्ण व कमकुवत झाल्याने तिच्या दुरुस्तीचीही आवश्यकता होती.
या समस्येबाबत परिसरातील ग्रामस्थांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्याकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती. त्याची दखल घेत १ सप्टेंबर २०२६ रोजी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन बंधाऱ्यांचे बेरिगेट्स/सुरक्षा गार्ड व पाइप्स तातडीने बसविणे, तसेच संरक्षण भिंतीचे मजबुतीकरण करण्याची कामे प्राधान्याने सुरू करण्याची मागणी केली होती.

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित विभागाकडून दुरुस्तीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. त्यामुळे बंधाऱ्याची सुरक्षितता वाढण्यासोबतच परिसरातील नागरिकांची वाहतूक व दैनंदिन ये-जा अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची दखल घेत ती प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments