LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे पोलीसाची धडक कारवाई मौजे आळगी ता.अक्कलकोट येथील शेतका-याच्या ऊसाच्या शेतातुन ०१ कोटी ०५ लाख, ५५ हजार रूपये किंमतीचा गांजा जप्त.



पंढरपूर(प्रतिनिधी):-
मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. विजय कबाडे, यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सोलापूर जिल्हयात अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबवून कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे कडील सपोनि प्रशांत बधे यांचे विशेष पथक नेमूण सदर पथकास कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.

दिनांक २८/०९/२०२६ रोजी सपोनि प्रशांत बधे व त्यांचे पथक अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीतील करजगी दुरक्षेत्र येथे पेट्रोलींग करीत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, मौजे आळगी ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथील शेतकरी आपल्या शेतातील ऊसाच्या पिकामध्ये गांजा सदृष्य वनस्पतीची लागवड केले असलेबाबत माहिती मिळाली. त्यावेळी मिळालेल्या बातमी प्रमाणे मा.श्री. विनोद घुगे, पोलीस निरीक्षक अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे यांनी सदरची माहिती हि मा.श्री. राजेंद्र टाकणे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट विभाग अक्कलकोट यांना कळवुन त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे कारवाई करणेकरीता मा. श्री. विनोद घुगे, पोलीस निरीक्षक, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे, सपोनि प्रशांत बधे व त्यांचे पथक कारवाई करणेकरीता गेले असता आरोपी नामे मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी उर्फ बिराजदार वय वय ६० वर्ष रा. शेगाव ता. अक्कलकोट जिल्हा सोलापुर यांच्या ऊसच्या शेतामध्ये पोलीसांनी पाहणी केली असता शेतातील ऊसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी अंदाजे १२ फुट उंचीची मोठी गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. ते पचंनाम्याअंर्तगत जप्त केले असता आरोपी यांच्या उसाच्या शेतामध्ये एकुण २४० गांजाची झाडे मिळुन आली पैकी २१० जिवंत गांजाची झाडे व वाळलेली ३० गांजाची झाडे होती. त्याचे वजन केले असता २११ किलो १०० ग्रॅम वजनाचे आढळुन आले. सदर जप्त करण्यात आलेला गांजाचा मुद्देमालाची अदांजे किंमत ०१ कोटी ०५ लाख ५५ किंमतीचा मिळून आल्याने अंमली पदार्थ गुन्हयाचेकामी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेचे सपोनि प्रशांत बधे यांनी जप्त करून कारवाई करुन सदरबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे गुरंन ५३१/२०२६, अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हयाचा तपास अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेचे सपोनि प्रशांत बधे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. विजय कबाडे, श्री. राजेंद्र टाकणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट विभाग अक्कलकोट सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे प्रभारी श्री विनोद घुगे यांचे नेतृत्वाखाली अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे,  पोसई राजशेखर निंबाळे, पोहेकॉ/१५३४ मोसलगी, पोहेकॉ/४९६ चिंचोळकर, पोकॉ/९७० कोळी, पोकॉ/६९ धुमाळ, पोकॉ/१३१६ डोंगरीतोट, मपोकॉ/२१७० हडपद, चामपोकॉ/५६ धनगर, पोकॉ/८८६ कोळी, पोकॉ/७२१ सुर्यवंशी, पोहेका /१४५५ पाटील, पोहेकॉ/१७८६ बिराजदार, पोका /१९५३ अन्सारी, पोकॉ/७६२ शिंदे, पोकॉ/२९६ पवार, पोकॉ/१३१६ डोगरीतोट, पोकॉ/१५२८ माने, पोना/५८१ कोले यांनी बजावली आहे.

Post a Comment

0 Comments