LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

लखुबाई गणेशोत्सव तरुण मंडळाचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श; रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद



पंढरपूर प्रतिनिधी:लखुबाई गणेश उत्सव गोविंदपूर तरुण मंडळाच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिक व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श मंडळाने या उपक्रमातून घालून दिला.

रक्तदान शिबिराचा शुभारंभ  नगरसेवक संदीप आधटराव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक बळवंतराव, उपाध्यक्ष हरी हुंगी, आधारस्तंभ अमित नेहतराव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक संदीप आधटराव,विकी शेठ मोरे, दिनेश महाराज खराटकर, संतोष बनकर, पप्पू आधटराव, सोमनाथ आधटराव,महेश मोठे, रोहित कांबळे,तसेच आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक जाणिवेतून मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवकांसह नागरिकांनी रक्तदानासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

गणेशोत्सवाच्या उत्साहाला सामाजिक सेवेची जोड देत लखुबाई गणेश उत्सव तरुण मंडळाने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रमांना चालना देत मंडळाने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व नागरिकांनी कौतुक केले.

रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते सोमनाथ अभंगराव,माऊली आबा आधटराव , रोहन कडलासकर ,अभिषेक ठाकूर, बालाजी मोठे, भैय्या कोरे, विठ्ठल करकमकर, आदेश परचंडे, मुकुंद आधटराव, संदीप बळवंतराव, अतुल बळवंतराव, सुरज कांबळे, रोहित कांबळे,सुनील अभंगराव, आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments