LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर - पंढरपूरचं निर्भीड मत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींना साडी वाटप उपक्रम श्रीराम मंगल कार्यालय, इसबावी येथे संपन्न झाला. यावेळी ३५६१ हजार महिला भगिनींना साडी वाटप सौ.सिमाताई प्रशांत परिचारक, सौ. आधटराव तसेच उपस्थित महिला नगरसेविका यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पंढरपूर - पंढरपूरचं निर्भीड मत 

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींना साडी वाटप उपक्रम श्रीराम मंगल कार्यालय, इसबावी येथे संपन्न झाला. यावेळी ३५६१ हजार महिला भगिनींना साडी वाटप सौ.सिमाताई प्रशांत परिचारक, सौ. आधटराव तसेच उपस्थित महिला नगरसेविका यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


याप्रसंगी पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतिश मुळे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, बालाजी मलपे, विशाल मलपे तसेच आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, प्रतिष्ठित नागरिक, महिला व पुरुष युवा युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवशक्ती तरुण मंडळ, गणेशभाऊ आधटराव मित्र मंडळ यांच्या वतीने सदर उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपले  मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, समाजकारण व राजकारण हे आपण स्वीकारलेले कर्म असून नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याचे काम आपण करत असतो. हे करत असताना स्वतःला काय मिळाले यापेक्षा आपण इतरांना काय देतो यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. कार्यकर्ता कसा असावा याचे ज्वलंत व उत्तम उदाहरण म्हणजे गणेशभाऊ अधटराव. गेल्या २५ वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी निरपेक्ष भावनेने आपले समाजकार्य केले आहे. हे करत असताना इसबावी सारख्या भागात विविध उपक्रमाद्वारे त्यांनी जनतेशी सुसंवाद साधून इसबावी भागाचा कायापालट केला आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वच कार्यकर्ते यांनी पंढरपूर शहर व तालुक्यात अंध अपंग निराधार याच्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, क्रीडा स्पर्धा आदी विविध उपक्रम राबविण्यात आली आहेत तर महिला व पुरुषांच्या आरोग्यासाठीही आरोग्य शिबिराचे नियोजन केले होते अशा विविध उपक्रमातून सर्वस्तरतील लोकांना एकत्र आणून जे सामाजिक कार्य केले ते खूप मोलाचे आहे.


कार्यकर्त्यांचे ऋण परिचारक परिवार कधीच विसरणार नाही  :मा आ. प्रशांत परिचारक 
 कार्यकर्त्यांचे ऋण व्यक्त व्हायचे नसते तर कार्यकर्त्यांच्या ऋणात राहायचे असते असा मोलाचा भावनिक संदेश प्रशांत परिचारक यांनी सदर कार्यक्रमाप्रसंगी दिला . कार्यकर्ता कसा असावा तर गणेशभाऊ आधटराव यांचा सारखा निरपेक्ष असावा, कार्यकर्त्यांचे ऋण परिचारक परिवार कधीच विसरणार नाही असे यावेळी बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले.

Post a Comment

0 Comments