LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

विषय – न्यु सातारा कॉलेज, कोर्टी येथे सिव्हील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी 'करिअर गायडन्स'वर व्याख्यान संपन्न.


बातमी: येथील न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलिटेक्निक) मध्ये सिव्हील अभियांत्रिकी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी 'करिअर गायडन्स व भविष्यातील संधी' या विषयावर नुकतेच एका विशेष अतिथी व्याख्यानाचे (Guest Lecture) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुर्डूवाडी शाखेचे उपविभागीय अभियंता श्री. ए. बी. मुळे उपस्थित होते. श्री. ए. बी. मुळे यांनी सिव्हील इंजिनिअरिंगमधील पदविका (Diploma) पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असणाऱ्या विविध शासकीय आणि व्यावसायिक संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि जलसंपदा विभाग (WRD) यांसारख्या शासकीय विभागांतील 'कनिष्ठ अभियंता' (Junior Engineer) पदाच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर त्यांनी विशेष भर दिला. तसेच, केवळ नोकरी करण्यावर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू करून आणि शासकीय कंत्राटदार बनून रोजगार निर्मिती करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम निकम यांच्याकडून ही शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे संस्था प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर शेडगे, प्राचार्य श्री. विक्रम लोंढे, उपप्राचार्य तथा ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर श्री. विशाल बाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्राचार्य लोंढे  यांनी विद्यार्थ्यांना गेस्ट लेक्चर चे महत्व समजावून सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. सिव्हील अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. विश्वनाथ कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्याख्यान यशस्वीरीत्या पार पडले. कार्यक्रमाच्या समन्वयक (Guest Lecture Coordinator) प्रा. ऋतुजा पवार यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सिव्हील अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक उपस्थित होते. या व्याख्यानामुळे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित भविष्यातील संधी अधिक सखोलपणे समजल्याची कृतज्ञतेची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अशा प्रकारच्या व्याख्यानांचे आयोजन अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments