LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🚩 *खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतले आई रुपाभवानी मातेचे दर्शन; शेतकरी आणि नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना*👉 *दुष्काळाच्या संकटातून शेतकरी व नागरिकांना लवकर दिलासा मिळावा, यासाठी देवीच्या चरणी साकडे*



महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानल्या जाणाऱ्या सोलापूर शहरातील आई रुपाभवानी मातेच्या मंदिरात खासदार प्रणितीताई शिंदे यांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी “आई उदो उदो, सदानंदीचा उदो उदो”, “भवानी मातेचा विजय असो” असा जयघोष करत त्यांनी देवीची आराधना केली.

दर्शनानंतर खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या, “आई रुपाभवानी मातेच्या दर्शनाने मनाला शांती आणि एक वेगळी ऊर्जा मिळते. ही ऊर्जा प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रेरणा देते.”

यावेळी त्यांनी आई रुपाभवानी मातेच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली की, सर्व माता-भगिनी, शेतकरी बांधव आणि नागरिकांच्या मनोकामना पूर्ण होवोत. सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो.

सध्या सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाअभावी दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य नागरिकही संकटाचा सामना करत आहेत. या कठीण परिस्थितीतून शेतकरी आणि नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा, शेतीला पुरेसा पाऊस मिळावा आणि सर्वांच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत, यासाठी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी आई रुपाभवानी मातेच्या चरणी मनोभावे साकडे घातले.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments