नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून आदर्श प्राथमिक विद्यालय येथे शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई महिला सेविकांचा समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून महिलांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत स्त्रीशक्ती, श्रमप्रतिष्ठा आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला.
मी समाजसेवेच्या माध्यमातून एक गोष्ट शिकलो आहे—समाज बदलण्यासाठी नेहमी मोठे काम करण्याची गरज नसते. कधी कधी एखाद्या व्यक्तीचा केलेला सन्मान, त्यांच्या चेहऱ्यावर आणलेले हास्य आणि त्यांना दिलेला आदर हाच खरा समाजसेवेचा अर्थ असतो.
समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मोठे उपक्रमच आवश्यक नसतात, तर आपल्या आजूबाजूला प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना सन्मान देणेही तितकेच महत्त्वाचे आहे,

0 Comments