LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी,गांजा विक्री करणारा आरोपी अटकेत,



आरोपीत याचेकडुन १७ किलो ९९४ ग्रॅम वजनाचा गांजा व स्वीप्टकार एकुण १५,७९,७००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

केंद्र शासनाच्या नशा मुक्त भारत मोहीमे अंतर्गत अंमली पदार्थ वीरोधी वीशेष मोहीम राबवीण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे त्यानुसार मा. पोलीस अधीक्षक यांनी या आठवडयामध्ये अंमलीपदार्थ वीरोधी मोहीम राबवीणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, यांना सुचना दिल्या होत्या.

सदर सुचना प्रमाणे पोनि / संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीकारी व पथकला कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. स्थानिक गुन्हे शाखेकडील विजय शींद यांच्या पथकातील पोकों/ 580 मनोज राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली की, कामती पोलीस ठाणेच्या हद्दीतून सोलापूर ते मीरज जाणारे महामार्गावर इंचगाव टोल नाक्या जवळ इसम नामे शुभम लालासाहेब काळे, हा त्याचेकडील स्वीप्ट कार क्र. एम एच 10 डी क्यु 8897 मधून मोठया प्रमाणात अंमली पदार्थ गांजा सोबत घेवून येत आहे. सदरची माहिती सदरची माहीत सपोनी शींदे यांनी श्री. संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना दिली. पोनि / जगताप सोबत टीम असे बातमीचे ठीकाणी रवाना झाले.

त्याप्रमाणे पोनी जगताप यांनी प्राप्त गोपनिय बातमी प्रमाणे कामती कडून बेगमपूरच्या दिशेने एक इसम आपल्या ताब्यात एक मारुती सुझुकी कंपनीची स्वीप्ट कार नंबर एम एच 10 डी क्यु 8897 घेवुन येत असल्याने सदर ठीकाणी सापळा लावून थांबलेल्या ठीकाणी सदरचा इसम येताच पोनी जगतपा यांनी सापळा पथकातील पोलीस अंमलदार यांना इशारा करुन सतर्क राहण्याच्या सुचना दील्या सदर इसम जवळ येताच पोनी जगतपा यांना बातमीतील हेच इसम असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी केलेल्या इशारा वरुन सापळा पथकातील अधीकारी व अंमलदार यांनी त्यांनी त्या इसमास जागीच पकडले त्यानंतर सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव शुभम लालासाहेब काळे, वय 28 वर्षे, रा. हरगुळ रेल्वे जवळ बार्शी रोड एमआयडीसी लातुर सध्या रा आंबेडकर नगर अरळी कॉर्नर जत, ता. जत, जि. सांगली असे असल्याचे सांगितले. तसेच त्याच्या ताब्यात असलेल्या स्वीष्टकार मधील पोते बाबत विचारपुस करता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देवु लागला. सदर पोते तपासले असता त्यामध्ये उग्र वास असलेला, ओलसर हिरव्या रंगाचा, पाने, बिया, बोंड आलेला मादक पदार्थ असलेला एकुण 8,99,700/- रुपये किमतीचा 17 किलो 994 ग्रॅम वजनाचा गांजा सह स्वीप्ट कार, मोबाईल असे एकुण 15,79,700/-किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आला. सदर इसमा विरुध्द त्यांचेविरूध्द कामती पो. ठाणे गुरनं 302/2026, गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनिमय १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (ब) अन्वये कामती पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद आरोपीस कामती पो. ठाणे गुरनं. 302/2026 मध्ये अटक करण्यात आली असून, मा. प्रथमवर्ग न्यायालय मोहोळ यांनी त्यास दि. 16/10/2026 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरचे अंमली पदार्थ त्याने कोठून आणले व कोठे नेणार होता याबाबत पोलीस कोठडी दरम्यान तपास सुरु आहे. पुढील तपास सपोनि/विजय शिंदे स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण हे करीत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक, विजय कबाडे, मा अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती प्रेरणा कटटे, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक, संजय जगताप स्था.गु. शाखा, यांचे नेतृत्वाखाली सपोनि/विजय शिंदे, पोलीस हवालदार / दशरथ गोरे, अवीनाश पाटील, रवी माने, अतुल घाडगे, पोकों/ अनवर आत्तार, मनोज राठोड,

प्रमोद गायकवाड, राहुल दोरकर तसेच कामती पोलीस ठाणे कडील पोसई अस्मान शेख, पोह/ काळजे यांनी

Post a Comment

0 Comments