LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

“स्वच्छतेचा संस्कार रुजवित आदर्श प्राथमिक विद्यालयात स्वच्छता मोहीम”



पंढरपूर(प्रतिनिधी)
राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आदर्श प्राथमिक विद्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि स्वच्छतेचे महत्त्व त्यांच्या दैनंदिन जीवनात रुजावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या मोहिमेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शाळा परिसराची स्वच्छता केली. यावेळी विद्यार्थ्यांना “स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे” याची जाणीव करून देण्यात आली. स्वतःचे घर, शाळा, परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला दिलेले महत्त्व आणि लालबहादूर शास्त्री यांनी देशसेवा, शिस्त व साधेपणाचा दिलेला आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आला. स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करून स्वच्छ शाळा, स्वच्छ परिसर आणि स्वच्छ समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजश्री घंटी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्वच्छता मोहिमेचे नियोजन व आयोजन यशस्वी करण्यासाठी शिक्षिका शीतल शेटे, लक्ष्मी बोडके, तृप्ती वाठारकर, श्वेता डोईफोडे, श्वेता ताड आणि सौ. दगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच उपक्रमासाठी नियोजनबद्ध सहकार्य केले.
या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष सतीशजी पुरंदरे, संस्थेच्या माजी अध्यक्षा वीणाताई जोशी, रेखाताई उंबरकर, डॉ. अनिल जोशी, ॲड. ज्ञानेश आराध्ये, मा. आमदार श्री. प्रशांत परिचारक, रेखाताई भालेराव, श्री. प्रशांत कुलकर्णी, डॉ. तेजस भोपटकर आणि श्री. प्रसाद संत यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वच्छता मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय, सामाजिक जबाबदारी आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याची जाणीव निर्माण झाली. ‘स्वच्छता हीच सेवा आणि स्वच्छता हीच जबाबदारी’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Post a Comment

0 Comments