प्रतिनिधी (पंढरपुर) :- एक सामाजिक बांधिलकी जोपासत न्यू सातारा इन्स्टिट्यूट अंतर्गत न्यु सातारा बीसीए कॉलेज , न्यु सातारा पॉलीटेक्निक आणि न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट कोर्टी, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्था प्रतिनिधी मा.श्री. ज्ञानेश्वर शेडगे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना संस्था प्रतिनिधी श्री.ज्ञानेश्वर शेडगे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगुन ,रक्तदान हे जीवनदान असून ते एका व्यक्तीचे प्राण वाचवते, विशेषत: शस्त्रक्रिया, अपघात किंवा गंभीर आजारामध्ये रक्त अत्यंत महत्त्वाचे ठरते. याशिवाय रक्तदान केल्याने रक्तदात्यांच्या आरोग्यालाही अनेक फायदे होतात .शरीरातील लोहाची पातळी संतुलित राहते आणि नवीन रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया गतिमान होते. नियमित रक्तदान केल्याने रक्ताची जाडी कमी करण्यास मदत होते तसेच त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तवाहिन्या संबंधीच्या समस्या कमी होतात असे ही त्यांनी शेवटी सांगितले. न्यू सातारा डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य श्री.विक्रम लोंढे यांनी आपल्या मनोगतातून रक्तदानाचे महत्त्व पटवून सांगितले व रक्तदान हे स्वतःच्या आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच पण एका व्यक्तीला नवजीवन देणारे हे एक श्रेष्ठ दान देखील आहे असे श्री.लोंढे यांनी सांगितले सदर शिबिरामध्ये विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक इत्यादी रक्तदात्यांनी रक्तदान केले.
न्यू सातारा इन्स्टिट्यूट नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते . न्यु सातारा इन्स्टिट्यूट मध्ये राबविलेल्या या भव्य रक्तदान शिबिराच्या स्तुत्य उपक्रमाचे विद्यार्थ्यांबरोबरच विशेषत: पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.राजाराम (नाना) निकम साहेब, व सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या
यावेळी प्राचार्य विक्रम लोंढे, संस्था प्रतिनिधी मा.श्री. ज्ञानेश्वर शेडगे, बीसीए कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. एन.एन.तंटक, बीसीए कॉलेजचे उप-प्राचार्य प्रा.प्रवीण ताठे , ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्री.विशाल बाड, ,डिग्री इंजिनिअरिंगचे प्रथम वर्ष विभाग प्रमुख श्री. सचिन सोनवणे , सर्व विभाग प्रमुख, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बिपिन कुलकर्णी यांनी केले तर आभार न्यु सातारा बीसीए कॉलेजचे उप-प्राचार्य प्रा.प्रवीण ताठे सर यांनी मानले.

0 Comments