LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सराईत गुन्हेगार शरद कोळी यास M.P.D.A. कायदयान्वये येरवाडा करागृहात स्थानबध्द "



मा. श्री. अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण हददीतील शरिराविषक तसेच मालाविषक गुन्हे वारंवार करणारे तसेच सामान्य नागरिकांना उपद्रव करणारे सराईत गुन्हेगारावर त्यांनी गुन्हेगारी कृत्य केल्यायावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. तसेच त्यांच्या वर्तनाना सुधारणा व्हावी, त्यांनी शांतता राखावी त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसावा यासाठी प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट आदेश केले आहेत.

शरद विठठल कोळी हा मुळ राहणारा अर्धनारी, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथील राहणारा असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, घातक हत्यारचा वापर करून इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, जबरी चोरी करणे, व इतर कलमान्वये गंभीर स्वरूपाचे हे पंढरपूर तालुका पोलीस ठाणे, सांगोला पोलीस ठाणे, कामती पोलीस ठाणे, मंगळवेढा पोलीस ठाणे, मंद्रुप पोलीस ठाणे या सोलापूर जिल्ह्यातील तसेच नांदेड व जळगांव या जिल्ह्यात देखील एकूण ०९ गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यामध्ये शरद कोळी याचेवर कायदेशीर कारवाई करून प्रतिबंधक कारवाई म्हणून त्यास यापुर्वी हददपार करण्यात आले होते. परंतू त्याने पुन्हा पुन्हा गुन्हेगारी कृत्य करुन सर्वसामान्य लोकांमध्ये त्याने दहशत व भिती निर्माण करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली होती.

शरद कोळी याच्या या वाढत्या गुन्हेगारी वृत्तीवर आळा घालण्यासाठी श्री. सुरेश चिल्लवार, पोलीस निरीक्षक, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी मा. श्री. अतुल कुलकर्णी, यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे M.P.D.A. कायदयान्वये प्रस्ताव सादर केला होता.

मा. श्री. कार्तिकेयन, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांनी सदर प्रस्तावीची पडताळणी करून शरद कोळी यास M.P.D.A. कायदयान्वये स्थानबध्द करणेबाबत आदेश निर्गमित केला होता. पोलीस निरीक्षक, श्री. संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. विजय शिंदे यांच्या पथकाने शरद कोळी याचा शोध घेत त्यास सांगली जिल्हयातून त्यास ताब्यात घेवून पुढील कारवाई करीता पंढरपूर तालुका पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे. तेथील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील स्थानबध्दतेसाठी शदर कोळी यास येरवाडा कारागृह येथे जमा करण्यात आलेले आहे.

सोलापूर ग्रामीण हद्दीतील शरिराविषक व मालाविषयक, वाळु तस्कर, अवैध दारू विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले असुन त्यांच्या विरुध्द M.P.D.A. कायदयान्वये यापुढे देखील अश्याच स्वरूपाची प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याबाबत मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांनी इशारा दिला आहे.

सदरचे स्थानबध्दतेचे आदेश मा. श्री. कार्तिकेयन, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांनी स्थानबध्दता आदेश निर्गमीत केले आहे. सदरची कारवाई ही मा. श्री. अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. श्री. विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्रीमती. प्रेरणा कट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पंढरपूर विभाग, मा. श्री. प्रशांत डगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर, मा. श्री. अभिजीत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर, यांच्या मार्गदर्शनाखाली व. पोलीस निरीक्षक, मा. श्री. संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, पो.नि. श्री. सुरेश चिल्लवार, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे, स.पो.नि. श्री. विजय शिंदे व पोहेकॉ मनसावाले, पोहेकॉ शेख, पोहेकों गोरे, पोहेको घाडगे, पोकों अत्तार, पोकॉ रामगुडे, पोकॉ घोरपडे, ने. स्थानिक गुन्हे शाखा, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील पोकों सागर गवळी, पोकॉ खांडेकर, पोकॉ गावडे, पोकॉ चव्हाण, इतर अधिकारी व अंमलदार यांनी तसेच मा. जिल्हादंडाधिकारी कार्यलयाकडील श्री. उत्कर्ष देवकुळे, ना. तहसिलदार, श्री. विलास म्हेत्रे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments