LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आयसीआयसीआय बँकेकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास सीएसआर निधीतून १० हजार पिशव्यांची मोफत भेट,



पंढरपूर, दि. १४ : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांना आयसीआयसीआय बँकेच्या सामाजिक दायित्व निधीतून (CSR) सेवाभावी तत्त्वावर १० हजार पिशव्या मोफत प्राप्त झाल्या आहेत. या उपक्रमामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा करणाऱ्या भाविकांना प्रसाद घेऊन जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

यावेळी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव तसेच आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या तुळशीपूजा, पाद्यपूजा व नित्यपूजा करणाऱ्या भाविकांना पूजेनंतर प्रसाद दिला जातो. हा प्रसाद भाविकांना सोयीस्करपणे घरी घेऊन जाता यावा, या उद्देशाने प्राप्त झालेल्या पिशव्यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना प्रसाद घेऊन जाणे अधिक सुलभ होणार आहे.

आयसीआयसीआय बँकेने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून केलेल्या या सहकार्याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने बँकेचे आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments