सोलापूर- *आज परम इन्फोटेक, नागेश करजगी स्कूल,सोलापूर केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या कॉम्प्युटर टायपींग बेसिक कोर्स (GCC-TBC) ऑक्टोबर-2026 च्या कॉम्प्युटर बिघाड व सर्व्हर डाऊन मुळे सुमारे 300 ते 400 विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते.विद्यार्थ्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी तात्काळ परिक्षा केंद्रावर जाऊन आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने सोलापूर माध्यमिक शिक्षणअधिकारी सचिन जगताप यांनी आज दिवसभराच्या सर्व चार सत्राच्या परिक्षा रद्द करून पुढील तारीख कळवली जाईल अशी ग्वाही दिली.*
आज सकाळ नऊच्या कॉम्प्युटर टायपींग परिक्षेत गोंधळ झाल्यामुळे विद्यार्थी घाबरून गेले होते.खासदार प्रणिती शिंदे यांनी शिक्षणअधिकारी यांना संपर्क करून परिक्षा केंद्रात बोलावून
आज दि.१५/१०/२०२६ रोजी घेतले गेलेली परीक्षा रद्द करून पुन्हा शासनाचे सर्व्हर पूर्णपणे सुरळीत व कार्यक्षम करून पुनर्परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात यावी. तसेच, विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी अनावश्यक प्रवास करावा लागू नये व त्यांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाचावा, यासाठी शक्यतो प्रत्येक तालुकानिहाय परीक्षा केंद्रे उपलब्ध करून देण्यात यावीत याशिवाय, तांत्रिक अडचणींमुळे रद्द झालेल्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून पुन्हा परीक्षा शुल्क आकारण्यात येऊ नये. पुनर्परीक्षेसाठी निवडण्यात येणारी परीक्षा केंद्रे संगणक, इंटरनेट, वीजपुरवठा, आवश्यक तांत्रिक यंत्रणा तसेच इतर मूलभूत सुविधांनी सुसज्ज असावीत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व्हर व संबंधित तांत्रिक यंत्रणेची योग्य तपासणी करून परीक्षा सुरळीत पार पडेल, याची दक्षता घेण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशी भुमिका खासदार प्रणिती शिंदे यांनी गेतली व महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अध्यक्ष नंदकुमार बेडासे यांना दुरध्वनी विद्यार्थ्यांच्या समस्या सांगितले व तात्काळ सोलापूर माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी परिक्षा पुढे ढकलली व नागेश करजगी स्कूल,सोलापूर परिक्षा केंद्र रद्द करून पंढरपूर व सिंहगड महाविद्यालय,सोलापूर केंद्र करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
*यावेळी सोलापूर युवक कॉंग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे,महेंद्र शिंदे, अनंत म्हेत्रे,हणुमंत जावीर,सचिन पवार,महेश लोंढे, यासीन शेख,सुर्या शेट्टीयार,धीरज खंदारे,दिनेश डोंगरे,शशीकांत शेळके,आकाश जांभळे,योगेश रणधिरे आदि उपस्थित होते.*
▬▬▬ஜ۩ (tp) ۩ஜ▬▬▬

0 Comments