पंढरपूर प्रतिनिधी : -
राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री, महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य, याची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाले नंतर प्रथमच पंढरपूर येथे आले असता पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील जनतेच्या वतीने आ. समाधान आवताडे यांनी श्री विठ्ठलाची व संत दामाजीची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी पालकमंत्री यांनी कर्मयोगी सहकारतपस्वी वंदनीय स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले..
यावेळी खासदार मा.श्री. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, भैरवनाथ ग्रुपचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव सावंत, अनिल सावंत, प्रणव परिचारक, तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते....
0 Comments