LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

न.पा.कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांना भेटवस्तू वाटप

 पंढरपूर नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नं.१ यांच्या वतीने माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचा शुभहस्ते सभासदांना भेटवस्तू वाटप

   पंढरपूर प्रतिनिधी  : - 





 पंढरपूर नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नं.१ च्या वतीने  सर्व सभासदांना प्रति वर्षा प्रमाणे माजी आमदार श्री.प्रशांतराव  परिचारक यांच्या शुभहस्ते  संस्थेचे ज्येष्ठ संचालक अँड सुनिल वाळूजकर, यांच्या अध्यक्षतेखाली कामगार नेते महादेव आदापुरे,नानासाहेब वाघमारे, संस्थेचे चेअरमन जयंत पवार, सेक्रेटरी राणी गायकवाड  यांचा प्रमुख उपस्थित भेट वस्तू वाटप करण्यात आले तसेच यावेळी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट इंडिया यांच्या वतीने पांडुरंग सहकारी साखर कारखाना चा उत्कृष्ट कार्याबद्दल बेस्ट चेअरमन म्हणून  विशेष साखर गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने ज्येष्ठ कामगार नेते नानासाहेब वाघमारे व संस्थेचे चेअरमन जयंत पवार यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार  प्रशांतराव परिचारक यांनी संस्थेच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त करुन संस्थेच्या उत्पन वाढीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन विनायक भांगे,सेक्रेटरी सौ.राणी गायकवाड, संचालक शरद वाघमारे, प्रितम येळे,सुनिल सोनार,अनिल अभंगराव, तानाजी अधटराव,  धनंजय वाघमारे, दिनेश साठे,सुनिल बोडके, नागनाथ तोडकर, संतोष सर्वगोड, गुरू दोडिया,संभाजी देवकर संजय माने, दत्तात्रय चंदनशिवे, दर्शन वेळापुरे, चेतन चव्हाण,  नवनाथ पवार,शिरीष माने,सुरेश पवार आणि बहु संख्येने सभासद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments