LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर शहर पोलिसांची आषाढी वारीच्या अनुषंगाने देशी दारू विरुद्ध मोठी कारवाई एकूण 155 बॉक्स पाच लाख 55 हजार 280 रुपयाची देशी दारू व अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो असा एकूण दहा लाख 55 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर शहर पोलिसांनी केला जप्त


      दि. 21/07/2026 रोजी पंढरपूर  आषाढी वारी अनुषंगाने अवैध चोरटी दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने केबीपी चौक या ठिकाणी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी टी वाय मुजावर हे त्यांच्या पथकासह नाकाबंदी करीत असताना एक संशईत अशोक लेलँड येत असताना त्याला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो तसाच निघून जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी थांबवून सदर गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये 

➡️1)एकूण 155 बॉक्स दारू 
➡️एकूण बाटल्या:-9436 बाटल्या 
90 मिली व 180 मिली
 ➡️एकूण किंमत 
5,55280 रुपये
➡️2) अशोक लेलँड दोस्त कंपनीचे चारचाकी वाहन  किंमत 
500000 रुपये
➡️एकूण किंमत 
10,55,280 रुपये
वरील प्रमाणे वेगवेगळ्या कंपनीचे दारूचे बॉक्स मिळून आले, त्यावेळी चालकाकडे कागदपत्रांची पाहणी केली असता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा परवानावर खाडाखोड करून कोणतेही गाडी चालवण्याचे लायसन्स शिवाय, त्यावर बॅच नंबरची नोंद नसताना,  तसेच वारी अनुषंगाने त्यांचेकडे असलेल्या वाहणावर रूट नमूद न करता विनपरवाना पालखी मार्गावरून देशी दारूची वाहतूक करताना नाकाबंदी मध्ये मिळून आल्याने सदर इसमाविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. सदर मिळून आलेला मुद्देमाल पंढरपूर शहर पोलीस यांनी जप्त केला असून अशोक लेलँडवरील चालक प्रवीण अशोक मोरे रा.पंढरपूर याचे विरुद्ध बी एन एस कलम 223 281 मुंबई दारूबंदी कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  "या कारवाईमुळे बेकायदेशीर मद्यविक्रीमुळे समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांना आळा घालण्यात यश आले असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाविरुद्ध पोलिसांची कारवाई भविष्यातही सुरू राहणार आहे."
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
 टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम सिंग मोटे,नितीन जगताप, युवराज पाटील पंकज गाडेकर पीएसआय दत्तात्रय लेंडवे पाटील,पोलीस हवालदार सुजित उबाळे पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र सूर्यवंशी नवले ठाकर पवार गोडस प्रसाद ओटी सुनील बनसोडे  शहाजी मंडले चालक पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब बडे यांच्या पथकाने केली

Post a Comment

0 Comments