पंढरपूर (प्रतिनिधी) भा ज पा भटक्या विमुक्त आघाडी राज्य उपाधक्ष पदी नितीन काळे यांची निवड करण्यात आली आहे. समाजसेवक नितीन काळे हे अनेक वर्षांपासून समाजामध्ये काम करत आहेत त्यांचे सामाजिक कार्य हे कौतुकास्पद असुन त्यांना अनेक संस्थेकडून राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाले आहेत... ते गेल्या अनेक वर्षांपासून समाजाच्या जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत.. त्यांनी कमी वयात म्हणजेच
22 व्या वर्षात आपल्या कार्याचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रात उमटविला आहे ... एक संघर्षमय योद्धा म्हणून नितीन काळे यांच्याकडे पाहीले जाते घरची परिस्थिती बेताची असताना देखील आपल्या कर्तुत्वावर यशस्वी व सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून आज त्यांची ओळख आहे... त्यांनी अनेक संघटनेत काम देखील केलेले आहे. आंदोलने देखील त्यांनी यशस्वी पणे केलेली आहेत व सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात... भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय व विश्वासु सहकारी म्हणून देखील त्यांची ओळख आहे त्यांच्या कार्याचे कौतुक अनेक मान्यवर करत आहेत... ते कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता अनेक जणांना होती पण ते भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला व त्यांना भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा आमदार श्री नरेंद्र पवार यांनीत्यांची निवड भाजप भटक्या विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी केली.एका होतकरू तरुण मुलाला एवढि मोठी काम करण्याची संधी भारतीय जनता पक्षाने दिल्याने नितीन काळे यांच्या सहकारी यांच्या वतीने पक्षाचे आभार मानले जात आहे... राजकीय कोणताही वारसा नसताना केवळ स्वतःच्या हींमतीवर ईथे पर्यंत पोहचलेले नेतृत्व आहे... त्यांच्या कार्याचे कौतुक आमदार ,खासदार व मंत्री महोदय यांनी देखील केले आहे.. नितीन काळे हे युवकांच्या प्रश्नांसाठी व जनतेच्या न्याय हक्कासाठी व एक यशस्वी युवा नेतृत्व म्हणून त्यांच्या कडे जनता पाहतेय.. भविष्यात एक सक्षम नेतृत्व नितीन काळे असतील असे अनेक जाणकार लोक सांगतात.
0 Comments