LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

नगरपालिकेच्या हलगर्जी पणाचा नागरिकांना निष्कारण ञास सोसावा लागतो - तालुकाप्रमुख संजय दशरथ घोडके

 



जन्म व मुत्यूची नोंद  नगरपालिका दप्तरी करणे प्रत्येक नागरिकाला बंधन कारक आहे व प्रत्येक नागरिक जन्म मुत्यूची नोंद नगरपालिका दप्तरी करीत आसतात परंतू जन्म दाखला घेते वेळी जर ती नोंद पंचवीस तीस वर्षाची आसेल तर नगरपालिका दप्तरी त्याची नोंद उपलब्ध नसते व तसे नगरपालिका प्रशासन नोंद नसले बाबत दाखला देतात व न्यायालयाचा आदेश आणण्यास सांगितले जाते. 

न्यायालयाचा आदेश आणण्यासाठी वकीलाची गरज लागते सुमारे पाच ते सात हजार रू .खर्चही  येतो व  सुमारे एक महिन्याचा कालावधी त्या साठी लागतो.  नगरपालिका च्या हलगर्जी पणाचा हा ञास नागरिकांना निष्कारणच सोसावा लागत आहे ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांना न्यायालयाच्या आदेशा व्यतीरीक्त शंभर रू च्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापञ घेऊन दाखला देण्यास काय हरकत आहे,  त्या मुळे वेळ आणी पैसा दोन्ही वाचणार आहे व नागरिकांचा ञास कमी होणार आहे,

नगरपालिका प्रशासनाने या गोष्टी कडे जाणिवपुर्वक लक्ष देवून निष्कारण होणारा ञास कमी करावा अन्यथा त्या साठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने तीव्र अंदोलन छेडले जाइल असा ईशारा लेखी निवेदनाद्वारे पंढरपूर नगरपालिका प्रशासनास देण्यात आला.


नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी मा. सुनीलजी वाळुजकर साहेब यांनी हे लेखी दिलेले निवेदन स्वीकारले, यावेळी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर तालुकाप्रमुख संजय दशरथ घोडके, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे,  उप शहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, शिवसेना पंढरपूर कार्याध्यक्ष अनिल कसबे, उप शहर प्रमुख ईश्वर साळुंखे, कैलास नवले शाखाप्रमुख पिंटू रेड्डी, शाखाप्रमुख प्रणित पवार शाखा प्रमुख विजय गंगणे, शाखाप्रमुख विजय जाधव,  उपशाखाप्रमुख किरण शिकलकर, माजी  उप शहर प्रमुख गजानन टल्लू, युवासेना पंढरपूर शहर समन्व्यक अमित ( पिंटू ) गायकवाड, शुभम यादव, गुरु अष्टेकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments