LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सुनेवर बलात्कार प्रकरणी सास-यास सर्व गुन्हयात दोषी धरून प्रत्येकी १० वर्ष सक्तमजुरी व २५ हजार रूपये दंडाची शिक्षा.

 

पंढरपूर (प्रतिनिधी)



मौजे चळे ता. पंढरपूर येथील आरोपी महादेव दाजी बनसोडे यास त्याची विवाहीत सुन हिचेवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी भादवि ३७६, ३७६ (२) (एन), ३७६ (२) (फ), ५०६ करीता दोषी धरून प्रत्येक कलमाकरीता १० वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी ७,५००/- हजार रूपये दंड व धमकी दिल्याप्रकरणी २५००/- रूपये दंडाची शिक्षा पंढरपूर येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश १ श्री एम बी लंबे साहेब यांनी सुनावली.


यात थोडक्यात हकीकत अशी की, मौजे चळे ता. पंढरपूर येथील आरोपी महादेव दाजी बनसोडे याने त्याचे घरामध्ये दि. १६/०४/२०२१ रोजी १०:३० वाजता ते दि. २४/०७/२०२१ रोजीचे कालावधीमध्ये पिडीत सुनेवर नातेसंबंधाचा गैरफायदा घेवुन फिर्यादी घरात एकटी असताना तिचेवर बळजबरीने कंडोमचा वापर करून जबरदस्तीने तिचे इच्छेविरूध्द शरीरसंबंध करून घडल्या प्रकाराबददल कोणाला सांगितल्यास तुझे जगणे अवघड होईल अशी धमकी दिली. वारंवार होणारा हा प्रकार पिडीत महिलेस असहय झाल्याने तिने आरोपीविरूध्द पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली होती. त्याप्रमाणे आरोपीविरूध्द गुन्हा रजिस्टर नंबर ५९४ /२०२१ भारतीय दंड संहिता कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३७६ (२) (फ), ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. यात तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे यांनी दोषारोपपत्र दाखल केलेले होते.


यात सरकारपक्षातर्फे एकुण ७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये पिडीत महिला, तिचे वडिल, पंच, साक्षीदार, वैदयकीय अधिकारी डॉ प्रदिप केचे, डॉ स्वाती बोधले, पोकों शिवाप्पा बिराजदार, तपासी अधिकारी प्रकाश मोरे यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. तसेच आरोपीतर्फे बचाव साक्षीदार म्हणुन डॉ सुरज पाचकवडे, आरोपीचा मुलगा औदूंबर बनसोडे, आरोपीचा भाऊ, बाबाहरी दाजी बनसोडे यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. सरकारपक्षातर्फे पिडीत महिलेची साक्ष ही अत्यंत महत्वाची असून तिच्या साक्षीवर देखील आरोपीस शिक्षा होऊ शकते. तसेच सदर फिर्यादीस झालेला विलंब तिने स्पष्टीकरण केलेले आहे आरोपीस अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्हयात खोटेपणाने गुंतविण्याचे कारण नाही व तसे वैमनस्य देखील नाही. पिडीतेचे वडिल व आरोपी यांच्यात जवळचे नातेसंबंध असून त्यांचे दरम्यान कोणताही वाद नाही त्यामुळे आरोपीस अशा केसमध्ये गुंतविण्याचे कारण नाही या सगळया परिस्थीती व सर्व साक्षीदारांनी एकमेकांना पुरक अशी साक्ष दिलेली आहे असा युक्तिवाद सरकारपक्षातर्फे करून त्याकरीता सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व उच्च न्यायालय, मुंबई यांचे न्यायनिवाडे सादर करण्यात आले. आरोपीने सदर घटना घडणे शक्य नाही, आरोपी वयस्कर व आजारी असल्यामुळे तो शरीरसंबंध करू शकत नाही, घटनास्थळाजवळचे साक्षीदार तपासले नाहीत व फिर्याद देण्यास विलंब झालेला आहे. त्यामुळे झालेली घटना संशयास्पद आहे असा युक्तिवाद केला. त्याप्रमाणे त्याप्रमाणे झालेला एकंदरीत पुरावा व दोषारोपपत्रातील कागदपत्रे याचे अवलोकन करून आरोपीस भादवि ३७६ करीता दोषी धरून १० वर्ष सक्तमजुरी व ७,५००/- रू दंड, ३७६ (२) (एन) करीता १० वर्ष सक्तमजुरी व ७,५००/- रू दंड, ३७६ (२) (फ) करीता १० वर्ष सक्तमजुरी व ७,५००/- रू दंड व कलम ५०६ करीता रूपये २५००/- दंड सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या असून गुन्हयात दि. ०५/०८/२०२१ पासून अटक असून त्यास जामीन मिळालेला नाही. त्यामुळे अटक मुदतीतील कालावधी शिक्षेत वजा करण्यात येईल तसेच दंडापैकी २५ हजार रूपये रक्कम पिडीतेस नुकसानभरपाई म्हणुन देण्यात येईल अशी शिक्षा सुनावली. यात सरकारपक्षातर्फे अॅड. सारंग वांगीकर यांनी काम पाहिले तर पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनतर्फे कोर्ट पैरवी मपोहेकॉ ब.नं. १३९२ अनिता नागराळे हे कार्यरत होते.

Post a Comment

0 Comments