पंढरपूर प्रतिनिधी:-
राजपूत समाज माजी यूवा शहराध्यक्ष अमरसिंह यांनी फिजिक्स विषयात पि.एच. डी. पदवी मिळवल्याबद्दल अ. भा.क्ष. महासभा व समस्त राजपूत समाज पंढरपुर यांचे तर्फे त्यांचा सत्कार तथा प्रितीभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी प्रास्तविक श्री विजयसिंह राजपूत यांनी केले.
गुण गौरव करताना सामाजिक कार्याध्यक्ष श्री रणजितसिंह म्हणाले की शहराकडे जावून प्रगती करा पण आपल्या संस्कृतिशी मूळाशी आपले नाते तोडू नका.
जिल्हाध्यक्ष श्री किसनसिंह यांनी तरूणांनी प्रेरणा घेत प्रगती करत समाजाचा गौरव वाढवा असे सांगीतले. विजयसिंह चौहान यांनी प्रोत्साहित करणारे गीत म्हणून दाखवले तर चंदेले परिवारा तर्फे केदारसिंह यांनी तसेच मंड वाले परिवार तर्फे संजयसिंह यांनी अमरसिंह यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
आभार प्रदर्शन श्री महेंद्रसिह यांनी केले.
याप्रसंगी अडचणीवर मात करत व खडतर प्रवास करत यश कसे मिळाले. गरीब परिस्थिति आणि बालपणातच वडिलांचे छत्र हरवल्यानंतरही केवळ आईच्या जिद्दीमुळे आणि वडिलधार्यांच्या शिकवणीमुळे आपण कसे घडत गेलो याबद्दल सांगताना अमरसिंह गहीवरले होते.
तरूणांनी परिस्थिति व अडचणींचे बहाने न बनवता जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमातून यश खेलने आणता येते. त्यासाठी प्रयत्न करा. सामाजिक बांधीलकी व देशाचे ऋण फेडण्यासाठी झटा. स्वत: ची प्रगती आपोआप होईल असा संदेश दिला.
या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष श्री बादलसिंह म्हणाले की
अमरसिंह याचे यश हे राजपूतांच्या मेहनती व जिद्दीचे उदाहरण आहे. त्याकडून प्रेरणा घेत तरुणांनी स्वत:ची, कुटूंबाची, समाजाची तसेच देशाची प्रगती व्हावी यासाठी मेहनत करावी. देव देश अन धर्म यांसाठी प्राण पणाला लावण्याचा वारसा असणार्या या भूमीचे आपण पूत्र आहात आणी सौभाग्याने आपणास संधी मिळाली आहे की आपण देशाची सेवा करा ती कोणत्याही मार्गाने असो डॉक्टर, इंजीनियर, वैज्ञानिक, व्यावसायिक सर्व आपणापेक्षा देश सर्वोपरि मानत कार्यरत राहीले तर भारत नक्कीच महासत्ता बनेल यात शंका नाही.
0 Comments