पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या तज्ञ प्राध्यापकांनी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामंजस्य करार करण्याच्या दृष्टीने खोपोली येथील कोप्रान फार्मास्युटिकल व पुण्यातील सोहम अरोमा या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना नुकतीच सदिच्छा भेट दिली.
‘कोप्रान’ ही एक अशी भारतीय औषध निर्मिती उद्योगातील आघाडीची कंपनी आहे ज्यांच्या उत्पादन सुविधांना व उत्पादनांना सर्वच खंडांमध्ये मान्यता आहे. कोप्रान कंपनी ही जगभरात आंतरराष्ट्रीय दर्जाची फॉर्म्युलेशन व फार्मास्युटिकल घटकांची निर्मिती आणि पुरवठा करते. कोप्रान च्या ४२८ पेक्षा जास्त उत्पादनांना ४६ पेक्षा जास्त देशांमध्ये मंजूरी मिळाली आहे. या सदिच्छा भेटी दरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली जसे की ही कंपनी आणि स्वेरी फार्मसी यांच्यात सामंजस्य करार प्रस्थापित करणे, कोप्रान प्रायव्हेट लिमिटेड येथे विद्यार्थ्यांची औद्योगिक अभ्यास भेट, बी. फार्मसी व एम. फार्मसी च्या विद्यार्थ्यांसाठी नोकरी संदर्भात निवड प्रक्रिया राबविणे इ. कोप्रान लिमिटेड सावरोली, खालापूर येथील भेटीदरम्यान, कोप्रान लिमिटेडचे उच्च अधिकारी प्लांट हेड अमोल कांबळे, कोप्रान लिमिटेडचे एचआर एस. के. शर्मा आदी उपस्थित होते. सोहम अरोमा प्रायव्हेट लिमीटेड येथे सुपर क्रिटिकल एक्सट्रॅक्शन या अद्ययावत व पुढील पिढीच्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी भेट देण्यात आली. सोहम अरोमा ही एक प्रक्रिया उद्योगात अतिशय प्रगत तंत्रज्ञानासह काम करणारी कंपनी आहे. येथे विविध अरोमॅटिक ऑइल्स व इसेन्शियल ऑइल्स ची निर्मिती केली जाते. दोन्ही प्रकारच्या ऑइल निर्मितीसाठी केवळ नैसर्गिक उत्पादनांचा जसे की लवंग, वेलदोडे, लेमन ग्रास, वाळा, कॉफी, दालचिनी इत्यादींचा वापर केला जातो. सोहम अरोमा प्रा. ली. ही कार्बनडाय ऑक्साइड च्या साह्याने सुपर्क्रिटीकल सॉल्व्हन्ट एक्सट्रॅकशन या तंत्रज्ञानाचा वापर ऑइल एक्स्ट्रक्शन साठी करणाऱ्या कंपन्यांमध्ये आघाडीची कंपनी आहे. या कंपनीच्या उत्पादन सुविधा व उत्पादनांना यूके, यूएसए, अरब देशांसह अनेक देशांमध्ये मंजुरी आहे. सोहम अरोमा व स्वेरी कॉलेज यांच्यामध्ये सामंजस्य करार प्रस्थापित करणे, विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्री व्हिजिट, तसेच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकास ही संकल्पना रुजविणे आदी उद्देशांनी या कंपनीला भेट देण्यात आली होती. अरोमॅटिक ऑइल एक्सट्रॅक्शन युनिट तसेच या उद्योगात असणाऱ्या विविध संधी तसेच पारंपारिक पद्धतींपेक्षा प्रगत तंत्रज्ञानाचा असणारा फायदा, या व्यवसायासाठी भविष्यकाळातील संभाव्य बाजारपेठ, प्रक्रिया युनिट व प्रक्रियेसाठी वापरला जाणारा कच्चामाल यांची किंमत अशा विविध बाबींचा या भेटीदरम्यान सखोल अभ्यास करण्यात आला. या भेटी वेळी सोहम अरोमा प्रा. लि. खेड शिवापूरचे प्लांट हेड सुभाष पाटील व इतर संचालक उपस्थित होते. या भेटी दरम्यान स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डॉ. व्ही. व्ही. मोरे, प्रा. प्रदिप जाधव व तज्ञ प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
0 Comments