LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांनसाठी आर्थिक साक्षरता शिबिर टेंभुर्णी येथे संपन्न

 


देशाचे नेते आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उच्च ८२ व्या वाढदिवसानिमित्त ओम साईराज मंगल कार्यालय टेंभुर्णी ता.माढा येथे आर्थिक साक्षरता शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष मा. श्री.नागेश फाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री.मयुर काळे यांनी केले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सोलापूर जिल्हाध्यक्षा सुरजाताई बोबडे व आर्थिक साक्षरता, जिल्हा अग्रणी बँक, सोलापूर समुपदेशक श्री.हनुमंत भालेराव उपस्थित होते.

  यावेळी मा.श्री.नागेश फाटे यांनी मार्गदर्शन करताना आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी राबविलेल्या उपाय योजना व महिलांना ५०% आरक्षण या साठी मोलाचे योगदान दिले असून संसदरत्न खा.सौ.सुप्रियाताई सुळे या देखील देशात व महाराष्ट्र राज्यात मोलाची भुमिका बजावित आहेत.तसेच महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते मा.श्री.अजित दादा पवार साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष मा.श्री.जयंतराव पाटील हे देखील महिलांच्या आर्थिक तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी सतत प्रयत्नशील आहेत.या बरोबरच माढा विधानसभेचे आ.श्री.बबन दादा शिंदे व सोलापूर जि.प.सदस्य युवक नेते मा.श्री.रणजीत (भैय्या)शिंदे आपल्या भागाचा विकास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.महिलांनी खरंतर दररोज संध्याकाळी आपल्या कुटुंबात व पती सोबत आर्थिक बाबतीत दररोज संवाद साधला पाहिजे.महिला या देशाच्या उच्च पदावर असून स्वता:ला कमी न लेखता प्रत्येक उद्योगधंद्यात उतरले पाहिजे.या मध्ये कापड उद्योग,कापडी पिशव्या बनविणे,पापड,लोणचे, मसाल्याचे पदार्थ,कडक भाकरी,फळांचे ज्यूस, ब्युटी पार्लर,इमेटेशन ज्वेलरी, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाया बरोबरच आर्थिक उन्नतीसाठी अनेक व्यवसायात खुप साऱ्या संधी असून महिलांनी एकत्र येऊन बचत गटा मार्फत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे व जिल्हा अध्यक्ष मयुर काळे यांनी अतिशय छान उपक्रम राबविल्या बद्दल कौतुक करुन त्यांना उद्योग व व्यापार विभागा मार्फत सहकार्य करु असे आश्वासन दिले.

*यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी श्री शिवाजी घाडगे व जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री सुरज ढवण,टेंभुर्णी शहर अध्यक्ष पदी श्री शुभम कानडे यांना नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष यांचे शुभ हस्ते देण्यात आले* .

या वेळी हनुमंत भालेराव व वित्तिय साक्षरता केंद्राचे श्री

पोपट चौधरी यांनीही मार्गदर्शन केले.

या वेळी उद्योजक श्री.संजय पवार,प्रदेश सचिव श्री.कल्याण कुसुमडे,श्री.शरद सातपुते (तालुका व्यवस्थापक उमेद फाऊंडेशन),श्री.अमोल माळी(बॅंक ऑफ बडोदा टेंभुर्णी),श्री.अविनाश शिंदे (केंद्र व्यवस्थापक, वित्तीय साक्षरता केंद्र, क्रिसल फाऊंडेशन मुंबई सह मोठ्या संख्येने महिला भगिनी व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments