अंगावर काळी शाई फेकण्याचा प्रकार मंगळवारी रात्री सोलापुरात आयोजित एका लग्नसमारंभात घडला. घटनेनंतर पोलिसांनी शाईफेकणाऱ्या तरुणाला पकडले आहे.
सोलापूरातील न्यू बुधवार पेठेत बुध्दराष्ट्र प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी आमदार देशमुख गेले होते. त्यावेळी गर्दीत अचानकपणे लाल पोशाख परिधान केलेल्या एका तरूणाने महापुरूषांच्या विरोधात अवमानकारक विधाने करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह सत्ताधारी भाजपाचे जबाबदार मंत्री व इतर नेत्यांवर कारवाई न करता सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत आमदार देशमुख यांच्या अंगावर काळी शाई फेकली.
0 Comments