LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर सिंहगड मध्ये मतदान नाव नोंदणी अभियान

 

रोटरी क्लब ऑफ पंढरपूर व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अभियान 


पंढरपूर: प्रतिनिधी

भारत देशासारखी सर्वात मोठी लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त जागरूक नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. 

आणि ही कल्पना लक्षात घेउन, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी मतदार जागृतीची मोहीम सुरू केली आहे. याच अनुषंगाने पंढरपूर रोटरी क्लब व सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील १८ वर्षे पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मतदान नाव  नोंदणी अभियान घेण्यात आले.




     पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या अभियानाची सुरवात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  महानिर्वाण दिनानिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पुजन पंढरपूर निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार पंडीत कोळी, महसूल सहाय्यक राजु शिंदे, प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा.  समाधान माळी (रजिस्टार), प्रा. सोमनाथ झांबरे, अकांऊट संजय बनकर, लिपिक नवनाथ माळी, अकांऊट लिपिक योगेश नवले, गणेश वसेकर सह विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.

  या अभियानात पंढरपूर तहसिल कार्यालयातील सहाय्यक लिपिक राजु शिंदे, मंडल अधिकारी विजय शिवशरण, गावकामगार तलाठी अनुप्रिता शेलार, विजया नाईक, कोतवाल म्हस्के, रोटरी क्लब पंढरपूर व सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments