LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने कल्याणराव पाटील सरांचा सन्मान

पंढरपूर ---

येथे पत्रकार सुरक्षा समिती पंढरपूर शहराध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांचे वडील श्री कल्याणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला 




   यावेळी कल्याणराव पाटील म्हणाले की पत्रकार हा समाजातील दुःख मांडण्याचे माध्यम असून सरकार प्रशासन शासन यांच्या उत्तम कामाचे कौतुक करावे तर त्यांच्या चुकीच्या कामाबाबत प्ररखड लेखन करणारे पत्रकार असावेत . या पत्रकार माध्यमातून समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे पत्रकार हा जनसामान्याचा आरसा असून सर्वसामान्य जनतेला न्याय अधिकार हक्क सेवा सुविधा योग्य पद्धतीने मिळवून देण्यासाठी या पत्रकार कार्याचा कर्तव्य आहेत असे ते म्हणाले.

  यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामभाऊ सरवदे बोलताना म्हणाले की, कल्याणरावजी पाटील हे ऋषितुल्य व्यक्तीमत्व  असून ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराचा वारसा घेऊन तावशी सारख्या दुर्गम भागात 1965 साली ही शैक्षणिक क्षेत्रातील पाया रुजवला आज त्या वृक्षचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे ,आजपर्यंत त्यांनी त्यांचा वाढदिवस शाळेतील मुलासोबत साजरा केलेला आहे आणि संपूर्ण आयुष्य शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी त्यांनी घालवलं त्याबद्दल त्यांनी पाटील सरांच्या कार्याचा संघाच्या वतीने कौतुक केले. याप्रसंगी सुरक्षा समितीचे कार्याध्यक्ष दिनेश खंडेलवाल, संघटक विनोद पोतदार, सदस्य अमोल गुरव यांनी आपले विचार मांडले.

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रशांत माळवदे तालुकाध्यक्ष, दत्ताजी पाटील शहराध्यक्ष, रामकृष्ण बिडकर, दिनेश खंडेलवाल, चैतन्य उत्पात, रवींद्र शेवडे, अमोल गुरव, विनोद पोतदार, शुभम पाटील, सत्यम पाटील, आदी मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments