पंढरपूर प्रतिनिधी : -
श्री.रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये इ. नववी ते इ. बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तालुका विधि सेवा समितीच्या वतीने कायदे विषयक शिबिराचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून करण्यात आले .
शिबीराची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस दिवाणी न्यायाधीश श्री. ए .आर .यादव यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सह.दिवाणी न्यायाधीश एस.आर. यादव म्हणाले की मुलांनी कायद्यांचे ज्ञान अवगत करुन त्याचा आपले जिवनात उपयोग करून घ्यावा.मुलांना त्यांचे वयोगटांनुसार त्यांना कायद्याचे संरक्षण समजावून सांगुन तसेच बालकावर होणारे लैंगिक अत्याचार संदर्भात असणारा पोक्सो कायदा, हुंडाबळी, विनयभंग, बलात्कार या संदर्भात असणारी कायद्याची ओळख विस्तृतपणे करून दिली. यामध्ये गोपनीयता कशी ठेवली जाते याचेही साधारण स्पष्टीकरण करण्यात आले. काही वेळा कायद्याचा आरोपीकडून गैरवापर होतो म्हणून विधी साक्षरता महत्त्वाची असल्याचे सांगून भविष्यात विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहिल्यास कायदेशीर गुन्हे कमी होण्यास नक्की मदत होईल असेही सांगितले
सरकारी वकील अॅड. मेडगिरी यांनीही आपले मनोगतात मुलांबाबतचे कायदे व संरक्षण या विषयावर उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.
अॅड. भगवानराव मुळे म्हणाले की कोर्टामध्ये कायदा माहित नाही म्हणून गुन्हा घडला असे म्हणता येत नाही. बालवयात मुलांना कायद्यांची माहिती हवी म्हणूनच अशा शिबिरांचे आयोजन करून मुलांना कायदेविषयक माहिती देत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. भातलवंडे, अॅड. एम. एम. नाईकनवरे प्राचार्या नंदिनी गायकवाड,ऐतवाडकर सर , पत्रकार नंदकुमार देशपांडे, वाघमारे अल्लापूरकर गुरुजी ,ढोबळे सर. विधी स्वयंसेवक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. भगवान मुळे यांनी केले
तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यारगट्टीकर सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन.आर.गंडाळे,डी.एम.भोसले. यांनी विशेष परिश्रम घेतले
0 Comments