LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

दुसर्‍याचा आनंद जाणनाराच खरा श्रेष्ठ दाता ः हभप विश्वंभर कदम

 पंढरपूर प्रतिनिधी : - 

समाजामध्ये अनेकांकडून विविध प्रकारचे दान केले जाते. यामध्ये अनेकवेळा दात्याचा आनंद दडलेला असतो. परंतु सामाजिक कर्तव्य पार पाडत दुसर्‍याचा आनंद जोपासत जो दानाचे कार्य करतो तो खरा श्रेष्ठ दाता असतो. असे प्रतिपादन ह.भ.प. विश्वंभर  महाराज कदम यांनी केले.

फोटो ओळ : नागनाथ मतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना मान्यवर.


पंढरपूर तालुक्यातील रोपळे विद्यालयातील इयत्ता दहावीच्या 1996 -97 बॅचच्या  प्रेरणेतुन येथील सचिन गणपत महामुनी यांचा वाढदिवस श्री नागनाथ मतीमंद शाळेतील बालकांसमेवत करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी ह.भ.प.कदम महाराज बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी महामुनी कुटूंबाने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करून  समाजातील गरजूंना  कशाप्रकारे सामाजिक आधाराची गरज आहे. हे विषद केले.

यावेळी कार्यक्रमासाठी दादासाहेब रोकडे, राजाराम माळी, विलास काकडे, पंडीत आदमिले, किशोर महामुनी, रोहित वाघमारे, हरिदास यादव, मख्याध्यापक मधुकर भोसले, बाळासाहेब खांडेकर, गौतम थोरबोले आदी उपस्थित होते. यावेळी मुलांना शैक्षणि साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.


गावच्या ख्यातीला उंचविणारा संकल्प....

जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये अन्नदानाचे गाव म्हणून रोपळे गावची ख्याती आहे. या ख्यातीला उंचविणारा संकल्प आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह.भ.प. विश्वंभर  महाराज कदम यांनी व्यक्त केला. गावच्यावतीने भाविकांना होणार्‍या अन्नदानाबरोबरच आगामी हरिनाम सप्ताहमध्ये मतीमंद व गरजू मुलांना अन्नदान करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर या व्यक्त करण्यात आलेल्या संकल्पामुळे  मतीमंद मुलांमध्ये आपला वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश सार्थकी लागल्याचे यावेळी सचिन महामुनी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments