श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक मा.बालाजी पुदलवाड यांना लेखी निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना व युवा सेना पदाधिकारी.
गेली पंधरा दिवस सोशल मिडीया व वृत्त पञातून श्री विठ्ठलास दान केलेल्या सोन्याच्या दागिन्यामध्ये पोतभर दागिने नकली आसल्याची बातमी प्रसिद्ध झालेली होती, त्या बाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीने कोणतीही चौकशी केल्याचे निदर्शनास आले नाही, या बाबतचे गौडबंगाल काय हा प्रश्न तमाम विठ्ठल भक्तांच्या व नागरिकांच्या मनात संभ्रम आवस्था निर्माण करत आसून त्या बाबत मंदीर समितीने व प्रशासनाने खुलासा करणे गरजेचे आहे, तो खुलासा करावा अन्यथा त्या साठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सेना स्टाईलने कोणत्याही क्षणी अंदोलन छेडले जाईल असा ईशारा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी आधिकारी मा.बालाजी पुदलवाड यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला.
यावेळी प्रमुख उपस्थित ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे, उमेश बापू काळे, शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, बाळासाहेब देवकर, युवासेना उपजिल्हा युवाधिकारी आकाश माने, युवासेना पंढरपूर उपतालुका युवा अधिकारी प्रणित पवार व समाधान गोरे, पंढरपूर शहर युवा अधिकारी श्रीनिवास उपळकर, युवा सेना शहर समन्वयक स्वप्निल गावडे, पंढरपूर शहर उपयुवाधिकारी अतिश काळे, गुरुदेव अष्टेकर, प्रशांत बागडे तसेच इतर शिवसेनेचे तथा युवा सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.


0 Comments