LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पालकमंत्र्याकडे माजी पालकमंत्र्यांची तक्रार

 प्रतिनिधी - सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व योजना बारामती आणि इंदापूर तालुक्यासाठी पळविल्या. याचाच एक प्रमुख भाग म्हणजे उजनीचे पाणी पळविण्याचा घाट बांधला. महाविकास आघाडी सरकारने जाणून-बुजून हे पाप केले असून सोलापूर जिल्ह्याला यामुळे मोठे नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आपण सोलापूरचे पालकमंत्री आहात आपल्या जिल्ह्याचे पाणी वाचवा अशी आर्त विनवणी एका निवेदनाद्वारे उजनी संघर्ष समितीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे

 सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी जलाशयाचे पाणी गतवर्षी 'सांडपाणी' या नावाखाली बारामतीकरांनी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र सोलापूर जिल्ह्यातील खमक्या शेतकऱ्यांच्या उग्र आंदोलनामुळे हा निर्णय तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्द केला. मात्र परवाच लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी सेना-भाजप युतीने ई-निविदा टेंडर प्रक्रिया प्रकाशित केली आहे. त्यामुळे जसा महाविकास आघाडी सरकारने सोलापूर जिल्ह्यावर अन्याय केला तसाच अन्याय भाजप शिवसेना सरकार करू पाहतंय का...? असा सवाल समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी पालकमंत्र्याना केला. त्यावेळी मी सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाही, आपले शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहे, ते सकारात्मक निर्णय घेतील असे आश्वासन ना.विखे-पाटील यांनी दिले.

 मात्र तुम्ही सोलापूरचे पालकमंत्री आहात आणि सोलापूरचे पाणी वाचवणे हे आपले परमकर्तव्य आहे. सोलापूर जिल्हा अगोदरच तहानलेला आणि दुष्काळाचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील अनेक उपसा सिंचन योजना बंद आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे त्यामुळे पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याचे पालक बनून हे पाणी वाचवावे अशी विनंती सचिव माऊली हळणवर यांनी हात जोडून केली.

 यावेळी कार्याध्यक्ष सुहास घोडके, सोमेश क्षीरसागर, बापू मेटकरी, धनाजी गडदे, मुबीना मुलानी, रामराजे डोलारे, राणा वाघमारे  आदी उपस्थित होते.

 - उजनी संघर्ष समितीने आज सोलापूर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे भेट घेऊन जिल्ह्याचे पाणी वाचवण्यासाठी निवेदन दिले. यावेळी अध्यक्ष अतुल खूपसे पाटील, सचिव माऊली हळणवर शंकर भाईजी साठे आदी.

Post a Comment

0 Comments