३ जानेवारी हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. त्यांनी जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. सावित्रीबाई या लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले. १८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. १० मार्च १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पंढरपूर शहर व तालुका सेनेच्या वतीने आज ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी समाजसेवक श्रीनिवास उपळकर, माजी उपशहर प्रमुख बाळासाहेब देवकर, शिवसेना विभाग प्रमुख पंकज डांगे - कोळी, शहर सचिव कैलास लोकरे, गणेश पवार, शाखा प्रमुख पिंटू रेड्डी, प्रणित पवार, विजय गंगणे, विशाल डोंगरे, राजाभाऊ पवार, अजय धोत्रे, अभिषेक पवार तसेच इतर शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांनी केले होते.


0 Comments