LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

विभागातून राज्यस्तरावर निवड झालेल्या मल्लांचा सत्कार करण्यात आला



वामनराव माने प्रशाला व कला ,शास्त्र कनिष्ठ महाविद्यालय ,भैरवनाथवाडी* येथे आज विभागातून राज्यस्तरावर निवड झालेल्या मल्लांचा सत्कार करण्यात आला पंढरपूरच्या इतिहासातील पहिली घटना आहे की एकाच प्रशालेतील चार मल्ल राज्यस्तरावर निवड झालेले आहेत ते मल्ल पुढीप्रमाणे                       

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा निवड 

1) जयदीप शहाजी चव्हाण 80 किलो गट  प्रथम क्रमांक 

2)अंकुश विश्वनाथ खतकर 55 किलो गट प्रथम क्रमांक

 3) संतोष मल्हारी ठोंबरे 92 किलो गट  प्रथम ग्रीको 

4)संग्रामसिंह संभाजी ढाणे ७९ किलो गट  प्रथम क्रमांक 

5)रणवीर सुरेश धुमाळ 71 किलो गट द्वितीय क्रमांक*

 सर्वांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष एड. श्री वामनराव माने सर (मा.सभापती पंचायत समिती पंढरपूर) यांच्या हस्ते  करण्यात आला तसेच क्रीडा शिक्षक श्री. नानासाहेब मदने सर ,श्री .एल. एस. लवटे सर, श्री .प्रतापसिंह चव्हाण सर, श्री .आप्पासाहेब खांडेकर, श्री. महेश देशमुख यांचाही सत्कार अण्णांच्या हस्ते करण्यात आला तसेच पालकांचाही सन्मान करण्यात आला सर्वप्रथम सौ. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन  करण्यात आले तसेच आपले सहकारी श्री. अविनाश      नाईकनवरे सर हे एल.एल.बी. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे सचिव व जिल्हा परिषद सदस्य श्री सुभाषराव माने सर संचालक डॉ. श्री. प्रतापसिंह माने , श्री .विजयसिंह माने सर श्री विक्रम सिंह माने सर  प्रचार्य श्री. उत्तमराव लवटे सर, ज्येष्ठ शिक्षक अशोकानंद राक्षे सर यांनी सर्वांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments