LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम म्हणजे सक्षम व मजबूत युवा पिढीची पायाभरणी आमदार - समाधान आवताडे

 पंढरपूर (प्रतिनिधी )


भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान ना.नरेंद्र जी मोदी  यांच्या गतिमान नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम म्हणजे सक्षम व मजबूत युवा पिढीची पायाभरणी असल्याचे मत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केली आहे. सदर शालेय उपक्रमाच्या अनुषंगाने शालेय विदयार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धांचे बक्षीस वितरण आमदार अवताडे यांच्या अध्यक्षतेखाली सिंहगड कॉलेज कोर्टी येथे संपन्न झाले. त्यावेळी आ. आवताडे हे बोलत होते. सदर स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या स्वखर्चातील  अर्थिक स्वरूपात भरघोस बक्षिसे वितरीत करून कौतुक सोहळा संपन्न झाला. पुनम अनिल रुपनर प्रथम क्रमांक - १५००० हजार रुपये, कु. वैष्णवी सिद्धेश्वर लेंगरे द्वितीय क्रमांक - १०००० हजार रुपये,कु. राजनंदिनी संभाजी फाटे तृतीय क्रमांक - ५००० हजार रुपये, १० स्पर्धक विद्यार्थ्यांना एक्सलंट वॉरियर्स म्हणून प्रत्येकी २००० हजार रुपये प्रमाणे २०००० हजार रुपये, तसेच २५ स्पर्धक विद्यार्थ्यांना सुपर वॉरियर्स म्हणून प्रत्येकी १००० प्रमाणे २५००० हजार रुपये अशी उत्तेजनार्थ बक्षीसे देऊन अभिनंदन पर सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून प्राविण्यप्राप्त शाळांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना आमदार आवताडे म्हणाले की, सर्वच सहभागी विद्यार्थ्यांनी अचूक कुंचल्यातून रेखाटन केलेल्या नेत्रदिपक चित्रांचे आणि कलेच्या समर्पक भाव निरागस कौशल्यांचे मला विशेष कौतुक आणि त्यांच्या कलेचा अभिमान आहे. बक्षीस वितरण करून आमदार महोदय यांनी यशवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शालेय पातळीवर व कॉलेज जीवनामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी हे नेहमी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कला कौशल्य दाखविण्यास प्रोत्साहन देत असतात. देशाच्या पंतप्रधानाच्या कार्याचा हाच आदर्श समोर ठेवून आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर व मंगळवेढा दोन्ही तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कमेच्या स्वरूपामध्ये बक्षीस देऊन त्यांना गौरविण्यात आले.

यावेळी , शशिकांत नाना चव्हाण,गादेगाव चे सरपंच मोहन आप्पा बागल श्री शांतिनाथ बागल , श्री द्रोणाचार्य हाके कोर्टी चे उपसरपंच महेश येडगे,गटनेते समाधान घायाळ श्री भैय्यासाहेब कळसे, भास्कर घायाळ ज्येष्ठ पत्रकार आमिन शेख,

श्री देवा अंकुशराव, श्री दत्ता कोळेकर श्री आयुब शेख,गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, शिक्षण विस्तार अधिकारी मारुती निगडे, शिक्षण विस्तार अधिकारी सौ बेबीनंदा पवार, केंद्रप्रमुख चंद्रकांत खुळे, केंद्रप्रमुख अण्णासाहेब पवार, उपशिक्षक शरदचंद्र चटे व भाजपा विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते. उपशिक्षक शरदचंद्र चटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून केले व उपस्थितांचे आभार  श्री. अण्णासाहेब पवार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments