LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

माघी वारीच्या तोंडावर २ लाख सोळा हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन केले जप्त. मोबाईल चोरट्यास केली अटक

 


.

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोबाईल चोरीचे  गुन्हे  उघडकीस आणुन एकूण २,१६,५००/- रू किंमतीचे ३५ मोबाईल हँडसेट जप्तीची उल्लेखनीय कामगिरी पंढरपूर शहर पोलिसांनी केली आहे.


पंढरपुर येथे कार्तिक वारीमध्ये येणा-या परजिल्हयातील भाविकांचे मोबाईल चोरीस गेल्याबाबत पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे भाग ५ गुरनं ८६६/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयामध्ये ०७ मोबाईल हँडसेट चोरी केलेबाबतची तक्रार प्राप्त झाली होती. गुन्हे पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे संदर्भात गुन्हा उघडकीस आणून आरोपीकडुन २,१६,५००/- रू किमतीचे चोरी केलेले एकूण ३५ मोबाईल हे गुन्हयाचे तपासकामी जप्त करणेत आलेले आहेत. वरील हस्तगत करणेत २,१६,५००/- रू किमतीचे ३५ मोबाईल हँडसेट हे    

सोलापूर जिल्हयातील व कर्नाटक राज्यातील असून ते एका आरोपीताकडुन वरनमुद चोरी गेलेला गुद्देमाल गुन्हे उघडकीस आणुन जप्त करणेत आलेला आहे.. सदरची उल्लेखनीय कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक श्री शिरीष सरदेशपांडे साो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. हिमंतराव जाधव सो, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, श्री. विक्रम कदम सो व श्री. अरुण फुगे सो, पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि चिमणाजी केंद्रे, पोसई दत्तात्रय आसबे, सपोफौ नागेश कदम, राजेश गोसावी, पोहवा ४१९ शरद कदम, पोहवा ३९६ सुरज हेंबाडे, पोहवा १०६३ केरे, पोना १७३६ सचिन इंगळे, पोना ४८४ सुनिल बनसोडे, पोना १७८९


सचिन बाडे, पोना १६५७ दादा माने, पोना ५६२ राकेश लोहार, पोको १२१६ शहाजी

मंडले व सायबर सेलचे पोका अन्दर आतार यांनी केली आहे.

आतिश उर्फ महादेव हणमंत सगर व २२ वर्ष धंदा मजुरी . ३२ खोल्या, संतपेठ पंढरपुर ता. पंढरपुर जि. सोलापुर.या संशयित आरोपीस मोबाईल चोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत. आता तीनच दिवसात चार महत्त्वपूर्ण वाऱ्यांपैकी एक अशी माघी वारी येत आहे. वारीच्या आधीच मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments