LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

माघ वारी संदर्भात पंढरीत विशेष पोलीस बंदोबस्त._ कोल्हापूर परिक्षेत्र अधिकारी सुनील फुलारी.

 


पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथे सुरू असणाऱ्या माघ वारी संदर्भात कोल्हापूर पोलीस परिक्षेत्र पोलीस अधीक्षक श्री सुनील फुलारी व पोलीस अधिकाऱ्यांनी पंढरपूर येथील पोलिस संकुल येथे आढावा बैठक घेऊन पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावेळी शहरात होणारी गर्दी, वाहतूक व्यवस्था, यात्रा कालावधीत होणारे अतिक्रमण, चोऱ्या, वाटमारी व ईतर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, पोलीस बंदोबस्त , गस्त पथक, आदी बाबत माहिती दिली. याचप्रमाणे सध्या गुळगुळीत रस्त्यांमुळे होणारे दुचाकी, चारचाकी वाहनांचे अपघात, वन्यप्राण्यांचे अपघात, जिल्ह्यात तसेच पंढरपूर तालक्यातील वाळू तस्करी, याविषयी माहिती घेतली.यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, शहर पोलीस निरीक्षक अरुण फुगे,तसेच पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments