LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

अद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईकांचा पंढरीत पुर्णाकृती पुतळा ऊभा करावा



पंढरपूर...स्वातंत्र्य पुर्व काळात इंग्रज सरकार ला सळो की पळो करून सोडणारा नरवीर अद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा पंढरपूर शहरात ऊभा करावा या साठी जय मल्हार क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा संघटक महेंद्र बापू चव्हाण व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर तालुकाप्रमुख संजय दशरथ घोडके  यांनी आज राजेउमाजी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पंढरपूर नगर पालीकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले 

निवेदनात राजे उमाजी नाईक यांनी आपल्या कार्य काळात जनतेसाठी मोठे योगदान दिले असून त्यांची स्मृती कायम जनतेला रहावी या साठी त्यांचा पूर्णाकृती पुतळा शहारात उभा करून तमाम रामोशी समाजाचा मान राखण्याचे आवाहन केले 

या वेळी  ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे. डेमोक्रॅटिक पार्टी आॅफ इडीयाचे अमित अवघडे  अॅडव्होकेट किशोर खिलारे सचिन चव्हाण विकास गायकवाड महेश मदने गणेश गायकवाड रमेश चव्हाण संदीप हाडमोड सोनू शिंदे अर्जुन चव्हाण महेश चव्हाण उत्तम बाबा चव्हाण पप्पू चव्हाण आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments