LOGO1

LOGO1














Ticker

    Loading......

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे पंढरपुरात जल्लोषात स्वागत.


अमित ठाकरे यांनी पायी चालत जाऊन घेतले श्री. विठ्ठल रुक्मिणीमातीचे दर्शन.

पंढरपूर /प्रतिनिधी

मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या होम ग्राउंडवर प्रथमच आलेल्या मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी येथील चोफाळा येथे अमित ठाकरे यांना क्रेनद्वारे भला मोठा हार घालून टाळ, मृदुंग आणि हरी नामाच्या गजराने व हलगी, ढोल व ताशाच्या गजराने शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी प्रथमच पंढरपुरात आलेल्या अमित ठाकरे यांनी सुमारे ३०० मीटर पायी चालत जाऊन श्री. विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेऊन वेगळाच आदर्श घालून दिला.

अनेक वेळा दर्शनासाठी आलेल्या व्हीआयपी पर्सन व नेतेमंडळी गाड्यांचा भला मोठा ताफा विठ्ठल मंदिराभोवती घेऊन जातात. या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र प्रथमच पंढरपुरात आलेल्या अमित ठाकरे यांनी पायी चालत जाऊन दर्शन घेऊन एक वेगळा संदेश घालून दिल्याने त्यांचे उपस्थित भाविकांमधून कौतुक केले जात होते.यावेळी जयवंत भोसले, प्रशांत गिड्डे, अरुंण भाऊ कोळी, शशीकांत पाटील, संतोष कवडे, गणेश पिंपळनेरक,र, अनिल बागल, कृष्णा मासाळ ,अमोल आटकळे ,राजाभाऊ उराडे ,किरण घाडगेझ सागर घोडके, विकी चव्हाण, सुरज देवकर ,धनंजय चव्हाण ,सुरेश टिळे ,आप्पाकरचे, महेंद्र पवार ,महेश पवार ,इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments