LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आ.समाधान आवताडे यांच्या हस्ते शेखावत यांचा सत्कार.

 


पंढरपूर(प्रतिनिधी) केंद्रीय जलशक्ती मंत्री भारत सरकार *मा. ना. श्री. गजेंद्रसिंग जी शेखावत साहेब* हे देवदर्शनसाठी पंढरपूर दौऱ्यावर आले असता पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे *विकासरत्न आमदार समाधान आवताडे  यांनी मंत्री महोदय यांचा परमात्मा श्री पांडुरंग व श्री संत दामाजीपंत यांची सुबकमुर्ती देऊन सत्कार केला व देवभूमीच्या पंढरी नगरीमध्ये सहर्ष स्वागत केले.


त्याचबरोबर आमदार मा. दादासाहेब यांनी मतदारसंघातील विविध धोरणात्मक विकासाच्या अनुषंगाने आवश्यक बाबींच्या पूर्ततेसाठी मंत्री महोदय यांच्याकडे निवेदन सादर केले. तीर्थक्षेत्र पंढरपूर नगरीचा झपाट्याने होणारा कायापालट व मूलभूत आणि पायाभूत विकासप्रणालीचा चढता आलेख यांचा आढावा घेऊन मंत्री महोदय यांनी मा. आमदार दादासाहेब यांच्या कार्य नेतृत्वाचे कौतुक केले.


याप्रसंगी खा. रणजितसिंह नाईक - निंबाळकर, आ. प्रशांतराव परिचारक, भारतीय जनता पार्टी जिल्हा संघटन सरचिटणीस मा. शशिकांत नाना चव्हाण, सोलापूर जिल्हा अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष,श्री.चांगदेव कांबळे उद्योजक मा.विनोदराज लटके,श्री.बालाजी वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments