पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथील इसबावी या उपनगरात असणाऱ्या दुर्गा शिशु विहार व प्राथमिक शाळा येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन शनिवार दि ११ फेब्रुवारी रोजी अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाले.
या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. विविध शालेय स्पर्धात प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री व सौ अरिहंत प्रवीणचंद कोठाडिया, प्रमुख पाहुणे डॉ शशिकांत कोठाडीया हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक गणेश अधटराव, माजी उपनगराध्यक्ष विशाल मलपे, नगरसेवक सचिन शिंदे, सनी मुजावर, संस्थेचे अध्यक्ष डॉ संतोष दोशी, पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक गणेश शिंगण, खजिनदार ज्ञानेश्वर मलपे, मुख्याध्यापिका हेमलता डांगे, सुनंदा डांगे, अतुल कौलवार , डॉ तृप्ती अतुल कौलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या विविध कला गुण, दर्शनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. संपूर्ण इसबावी परिसरात या कार्यक्रमाची चर्चा सुरू होती.
0 Comments