LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

उजनी धरणाूवर मोठ्या उंचीचे बॅरेजेस बांधणेबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.शेखावत सकारात्मक – मा. आ. प्रशांत परिचारक.

पंढरपूर (प्रतिनिधी)


भारत सरकारचे केंद्रीय जलशक्तीमंत्री मा.ना.श्री.गजेंद्रसिंह शेखावत यांनी पंढरपूर येथे भेट दिली असता त्यांचेकडे उजनी बंधाऱ्याच्या नदीपात्रावर मोठ्या उंचीचे बॅरेजेस बांधण्याची मागणी मा.आमदार प्रशांत परिचारक यांनी केली होती, त्यास ना.शेखावत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यातील शेती व पिण्याचे पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, महाराष्ट्रातील उजनी बंधाऱ्याच्या खालील बाजूस म्हणजेच सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत अंदाजीत १२० किमी लांबपर्यंत भीमा नदी वाहते. दरवर्षी होणाऱ्या पावसाळ्यात अंदाजे ५०ते १००टीएमसी पर्यंत पाणी हे कर्नाटकात वाहून जाते. हे पाणी भीमा नदीच्या फ्री कॅचमेंटमधील आहे. ते कुठल्याही पाणी लवादामधील पाणी नाही. हे वाहून जाणारे पाणी जर मोठे उंचीचे बॅरेजेस बांधून अडवले गेलेतर सोलापूर जिल्ह्यातील शेती व पिण्याचे पाण्याचे दृष्टीने महत्वाचे होईल, त्यामुळे उजनी धरणावरती येणारा अतिरिक्त पाण्याचा ताण कमी होईल. यासाठी अंदाजे २५ टीएमसी पाणी अडविण्याचे एकलाँग टर्म प्लॅन बनवून या कामाला गती दिल्यास पुढील काळातील अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्‍न निकाली निघेल. अशी मागणी प्रशांत परिचारक यांनी केली, त्यास ना.गजेंद्रसिंह शेखावत यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून केंद्र सरकारकडून याबाबत आवश्‍यक ती कार्यवाही करावी. याबाबत पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments