पंढरपूर (प्रतिनिधी) पूर्ण मोबदला दिल्याशिवाय कॉरिडोर होणार नाही.
पंढरपूर येथील रहिवाश्यांना पूर्ण मोबदला दिल्यावरच कॉरीडॉर करण्यास सुरुवात केली जाईल. अशी माहिती भा ज पा चे आमदार, निवडणूक प्रभारी श्रीकांत भारतीय यांनी पंढरपूर येथे श्री श्री विठ्ठल रुक्मिणी देवी दर्शनास आल्यवर मंदिरात दिली.
यावेळी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे,अक्कलकोटचे आमदार श्री सचिन कल्याणशेट्टी, माळशिरस चे आमदार श्रीराम सातपुते, तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, माऊली हळणवर तसेच विविध भा ज पा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना भारतीय म्हणाले, भारतीय जनता पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. आज श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनी, चांगल्या मुहूर्तावर यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे आशीर्वाद घेण्यासठी आलो आहे.२०२४ साली विधानसभा निवडणुकीत आम्ही व बाळासाहेबांची शिवसेना मिळून २०० पेक्षा जास्त जागा जिंकून दाखवू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
0 Comments