मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धापूर या विद्या संकुलामध्ये आयोजित करण्यात आलेल्या *फूड फेस्टिवल"* या शालेय प्रकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे *बेस्ट सभापती मा. सोमनाथ जी अवताडे* यांच्या हस्ते करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रातील अध्ययन आणि अध्यापन सारख्या ज्ञानसाधनेच्या कार्यकृतीसोबतच विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक गुणांचा व उपक्रमशील गुणवत्तेचा समतोल अधोरेखित करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन होणे ही काळाची गरज आहे. आधुनिक काळातील या स्पर्धात्मक जगामध्ये आपला विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी सदर शाळेने घेतलेला हा कार्यक्रम म्हणजे सर्वांगीण विद्यार्थीकौशल्य विकासाची नांदी असल्याचे मत मा सभापती महोदय यांनी यावेळी बोलताना काढले.
यावेळी विचारमंचावर ज्येष्ठ नेते मा.सिद्धेश्वर चौगुले सावकार, जिल्हा लेबर फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मा. सरोजभाई काझी, युवक नेते मा. सचिन दादा चौगुले, शाळेचे मुख्याध्यापक मुलाणी सर आदी मान्यवर व शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
0 Comments