पंढरपूर (प्रतिनिधी)आठवणीतील सुवर्णक्षण,या के बी पी कॉलेजच्या गेट टुगेदर म्हणजेच माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दि१२ फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथील के बी पी कॉलेजच्या आवारात होणार असून विविध वर्षाच्या शेकडो माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. यामुळे हा स्नेहमेळावा अनोखा आणि संस्मरणीय होणार, यात शंका नाही. रविवारी सकाळी दीप प्रज्वलन करून विविध कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे.या वैविध्यपूर्ण स्नेहमेळाव्यात जुन्या पंढरपूर कॉलेज पंढरपूर मधील माजी विद्यार्थी माजी आमदार प्रशांत (मालक) परिचारक, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील,तसेच कॉलेज मध्ये शिक्षण घेतलेले प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले माजी विद्यार्थी,विद्यार्थिनी आपले महाविद्यालयीन जीवन, त्या काळचे वातावरण , जुने पंढरपूर कसे होते? याविषयी उजाळा देणार आहेत.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ प्राजक्ता बेणारे, मंगेश देशपांडे, शाम सावजी, सौ पद्मा सावजी, निर्मला भिंगे, दिलीप सुरवसे, राजेंद्र केंगार, मनू दाते, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले विजय परदेशी, रामेश्वर कोरे, मुन्ना शेख, सौ माधुरी वैद्य, सौ मंजुषा कुलकर्णी, सौ फैमीदा विजापुरे, डॉ चांगदेव कांबळे, श्री जेधे सर, श्री काळेलसर, आसिफ बेद्रेकर, मुसा इनामदार, दीपक घोगरदरे, मुकुंद मागाडे, अविनाश नलबिलवार, आशिष शहा, राजू गुज्जलवार, ज्योती पतकी, मिलिंद अढवळकर , मुन्ना शेख राजेंद्र कोरले, अनिल पवार आदी मान्यवर परिश्रम घेत आहेत.
0 Comments