पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथे अभिनव अकॅडमी चा १२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा. सौ. माधुरी जोशी (व्हा. चेअरमन, दि. पंढरपूर को. ऑप.अर्बन बँक) यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रमुख वक्त्या डॉ. सौ. संगीता पाटील यांनी "वक्तृत्वाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व" या विषयावर मार्गदर्शन केले. उत्तम वक्ता होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्व स्तरातील व्यक्तींना वक्तृत्वकला अंगी असणे गरजेचे आहे हे सविस्तरपणे सांगितले.
या सर्व कार्यक्रमाचे संचालन अभिनवच्या प्रशिक्षणार्थ्यांनी केले हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ! अध्यक्षीय समारोप करताना सौ. माधुरी जोशी यांनी अभिनव अकॅडमीच्या उपक्रमाला शुभेच्छा देऊन व्यासपीठावरून गायनाच्या, भाषणाच्या माध्यमातून व्यक्त होत असताना तुमच्या अंगी विनम्रता असली तरच तुमचं सादरीकरण तुमच्यासह समोरील श्रोत्याला समाधान देणारं ठरते असे सांगून पंढरपूरसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य अकॅडमीच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रामेश्वर कोरे, स्वागत सौ. कविता राजमाने, अध्यक्षीय सूचना श्री. धनंजय राक्षे, अनुमोदन श्री. सारंग महामुनी, पाहुण्यांचा परिचय श्री. तेजस सुतार, सौ. संगीता पवार, आभार सौ. स्वाती शेंडे यांनी तर सूत्रसंचालन श्री. मधुकर पवार व डॉ. अर्चना शेडगे यांनी केले. अभिनव अकॅडमीच्या वतीने डॉ. सौ. मैत्रेयी केसकर यांनी प्रतिनिधीक मनोगत व्यक्त केले. अभिनव अकॅडमीचे संचालक मंदार केसकर, अभ्यागत व्याख्याते डॉ. सचिन लादे, सोमनाथ गायकवाड यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास सौ. रजनीताई देशमुख, श्रीमती मानसी केसकर, सौ. डिंपल घाडगे, सौ. स्वाती जोशी, सौ. सगुणा शेडगे, प्रताप चव्हाण, ऍड. संदीप कागदे, डॉ. प्रतिभा देशपांडे, सौ. वैशाली काशीद, संजय, कुलकर्णी, प्रविण देशपांडे, सुनील जगताप सर व अनेक मान्यवर उपस्थित होते.
0 Comments