LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

संजय सुरवसे यांना मानाचा पुरस्कार जाहीर

      नाभिक टायगर सेना महाराष्ट्र राज्य अक्कलकोट तालुका अध्यक्ष श्री संजय सुरवसे यांना मानाचा पुरस्कार जाहीर 



          *जर्नालिस्ट यूनियन ऑफ़ महारष्ट्र, मुबंईच्या वतीने दिला जाणारा मानाचा पुरस्कार वागदरी येथील सामाजिक कार्यकर्ता श्री संजय सुरवसे यांना जाहीर झाला आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या उत्तम कार्याचा दखल जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र, मुबंई यांनी घेऊन पुरस्कार जाहीर झाला आहे.* 

         *कोरोना काळात संजय सुरवसे यांनी समाजातील गोरगरीबांना घरोघरी जावुन मदत केले आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिति लक्षात घेवुन शैक्षणिक साहित्य वाटप, जळीतग्रस्त कुंटुंबियाना आर्थिक मदत करणे अशा अनेक समाज उपयोगी कार्य सतत करीत आहेत. त्यामुळे या कार्याची दखल राज्य पातळीवर घेतले आहे. स्वता:ची आर्थिक परिस्थिति हलाकीची असताना देखील समाजाचे काही देणं लागत या भावनाने ते कार्य करीत आहेत. या अगोदर देखील दोन वेळा त्यांना जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार देवुन गौरविण्यात आले होते. 

वार्षिक पत्रकार पुरस्कार चे आयोजन 26/2/2023 रोजी मुंबई, दादर प प्रभा देवी येथे रविद्र नाट्यगृहात आयोजन केले आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, महाराष्ट राज्यातील अनेक राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. महाराष्ट राज्य विधीमंडळाचे उपायुक्त श्री नरहरी झीरकर यांचे हस्ते देण्यात येणार आहे.अशी माहिती प्रदेश संघटक श्री सतीश साटम मुंबई यांनी दिली आहे.*

Post a Comment

0 Comments