LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शेटफळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर अतिक्रमण हटवण्यासाठी अमर उपोषण.

 


पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील मौजे तपकिरी शेटफळ, ता. पंढरपूर जि. सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर ग्रामपंचायत तपकिरी शेठफळ यांचे मार्फत शॉपिंग सेंटरचे बांधकाम केले आहे या परिसरात अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले आहे.या विरोधात ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.. संपूर्ण महाराष्ट्रात असे स्मारकासमोर अतिक्रमण करून बांधकाम करून दलित व बहुजन समाजाच्या भावना दुखवून गावामध्ये शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याच्या जातीयावादीदृष्टीने हे बांधकाम करून अतिक्रमण केले आहे.


तसेच या संदर्भात मा.ना. रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका समोरील अतिक्रमण हटविणेबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांना उचित कार्यवाही करणेसाठी लेखी पत्राद्वारे कळविले आहे. तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी सोलापूर यांनी गटविकास अधिकारीसोर, पंचायत समिती पंढरपूर यांना अतिक्रमण हटविणेबाबत लेखी हाथ आदेश देवूनसुद्धा आजतागायत या संदर्भात उचित कार्यवाही केली नाही म्हणजे मा.ना. रामदासजी आठवलेसो ग्रामसेवाच्या प्रत्राचा अवमान आहे.

ग्रा.पं.किरी शेटली 3 लेखी आदेश देवूनसुद्धा संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जायीत तेढ निर्माण करून गावमधील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.  सदर अतिक्रमण हटविण्यासंबंधित कार्यालयास वारंवार लेखी व समक्ष भेट देवूनसुद्धा याकडे दुर्लक्ष केले

Post a Comment

0 Comments