कुटुंबियांनी केले ऋण व्यक्त
मंगळवेढा(प्रतिनिधी)ः मंगळवेढा नगरपरिषद यांचेवतीने व सुरसंगम ग्रुप आणि मंगळवेढा म्युझिक क्लब यांच्या सौजन्याने भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त मेरी आवाजही पहचान है हा हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करून सलग बारा तास गायनाने आदरांजली वाहिली.
दरम्यान,सदरच्या अनोख्या उपक्रमाची माहिती मंगेशकर परिवाराच्या पुण्यातील नातेवाईकांनी त्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून दिल्यानंतर मंगेशकर कुटुंबियांनी या उपक्रमाचे कौतुक करून संयोजकाचे आभार मानल्याचे पत्र पाठविले आहे.
श्री गणेश बालोदयान येथे सकाळी 9.00 वा. या कार्यक्रमास सुरुवात झाली. व्यासपीठ पूजन धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन प्रा.शोभा काळुंगे यांच्या हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षण प्रसारक मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ.मिनाक्षी कदम यांच्या हस्ते स्व.लता मंगेशकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
सलग बारा तास चाललेल्या या कार्यक्रमात सुरसंगम ग्रुपचे दिगंबर भगरे,लहू ढगे,नवनाथ सावळे,निशिकांत प्रचंडराव,संतोष ढावरे, शिवाजी इंगोले,अनिल गायकवाड,रविंद्र लोकरे,अजय सरवदे,सिराज फकिर,शुभदा जोशी,प्रफुल्लता स्वामी,संगीता इंगोले,लक्ष्मी माने,छाया शिंदे,गायत्री प्रचंडराव,वंदना तोडकरी,अल्फिया मुलाणी यांचेसह डॉ.मिनाक्षी कदम,अॅड.दत्तात्रय खडतरे,लक्ष्मीकांत लिगाडे,इसाक शेख,बाळू गडहिरे,अजित सासणे,एन.जे.कुलकर्णी,सुदर्शन माने,अभय जाधव,अक्षय गुळीक,अमर गुळीक,बाबासाहेब पवार,विदया माने,अॅड.हसिना सुतार,निकिता जाधव यांचेसह मंगळवेढा,सांगोला,पंढरपूर,मोहोळ,सोलापूर,पुणे,सांगली व मुंबई येथून आलेल्या अनेक गायकांनी तब्बल 135 गीते सादर केली.
रात्रौ 9.00 वा. सहभागी झालेल्या गायकांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गायक डॉ.राजीव मोहोळकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देवून सन्मानीत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ.मिनाक्षी कदम,मसाप दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीधर भोसले,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,सुरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे,मंगळवेढा म्युझिक क्लबचे अध्यक्ष लहू ढगे,ज्ञानदीप संस्कार भारतीचे अध्यक्ष संभाजी सलगर,राजकारण सत्यापलिकडचे या वेब सिरीचे दिग्दर्शक पांडुरंग पाटील,मुख्य कलाकार विशाल सलगर,राज्य आदर्श शिक्षक लक्ष्मण नागणे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमास अजित जगताप,तुकाराम कुदळे,नारायण गोवे,मारुती वाकडे,यतिराज वाकळे,अॅड.रमेश जोशी,राजेंद्रकुमार जाधव,गणेश यादव,दिलीप कोष्टी,रेखा जडे,स्वरूप मोहोळकर,विजय शेंडगे,स्वाती मोहोळकर,सतीश दत्तू,पिंटू माने,दत्तात्रय इंगोले,बबलू सुतार,सतीश दत्तू,अॅड.दत्तात्रय तोडकरी,राम पवार,शिवम माने,राजेंद्र जावळे,बबन भोसले,बाळासाहेब जावळे,विनायक हजारे,अझहर काझी,अर्जून ओमने,राहुल हजारे,दावल इनामदार,दशरथ फरकंडे,ज्ञानेश्वर मंडले,अजित घुले,विजय कोंडूभैरी,विजयरत्न दत्तू यांचेसह अनेक रसिक उपस्थित होते.
12 तास चाललेल्या या कार्यक्रमाचे प्रास्तविक,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नवनाथ सावळे यांनी केले.
0 Comments